मुंबई :  अभिनेत्री प्रिया बापट नेमहीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर प्रियाचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. एखादी पोस्ट प्रियाने शेअर करताच ती व्हायरल व्हायला वेळ लागत नाीह. अवघ्या काही वेळातच प्रियाच्या पोस्ट व्हायरल होतात. प्रियाने अनेक टीव्ही मालिका नाटक आणि सिनेमातून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. प्रियाने केवळ मराठीच नव्हेतर हिंदी सिनेमातूनही आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहेय मात्र यावेळी प्रियाने असं वक्तव्य केलंय जे ऐकून तुमच्याही पायाखालची जमिन सरकेल. नुकतीच प्रियाने एक मुलाखत दिली आहे. ज्यामध्ये तिने तिच्यासोबत घडलेला धक्कादायक खुलासा केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अभिनेत्रीने तिच्यासोबत घडलेला धक्कादायक प्रकाराचा खुलासा केला आहे. दिलेल्या मुलाखतीत धक्कादायक घटनेबद्दल सांगिताना प्रिया म्हणाली, "मी एकदा शूट संपवून घरी जात होते. तेव्हा माझ्या हातात पिशव्या होत्या. मी फोनवर बोलत-बोलत चालत होते. त्याच वेळी अचानक एक माणूस माझ्यासमोर आला. त्याने माझ्या छातीला हात लावला आणि एका क्षणातच तो तिथून पळून गेला. मी मागे वळून पाहिलं तर तो माणूस तिथे नव्हता. नेमकं काय घडलं? हे समजायलाच मला काही वेळ लागला."


"ती घटना घडल्यानंतर मी घरी आले. माझी आई घरी नव्हती.तेव्हा बाबा घरी होते. मी घरी आल्यानंतर रडत होते. त्यामुळे बाबा मला काय झालं विचारत होते? त्यांना काय सांगावं हेच मला कळत नव्हतं. मी घडलेला सगळा प्रकार त्यांना सांगितला. जे काही घडलं त्याचं त्यांना वाईट वाटत होतं, त्याक्षणी त्यांना असहाय्य सुद्धा झाले होते. त्या घटनेचा राग मला अजून आहे, आता लोकांची नजर जर मला वाईट वाटली किंवा मला असं वाटली की, हा माणूस मला हात लावणार आहे, तर मी त्याचा हात धरुन मारेन, इतका राग माझ्या मनात आहे." , असं प्रियाने दिलेल्या मुलाखतीत सांगितलं.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


सध्या प्रियाची ही मुलाखत मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. शेअर केलेल्या व्हिडीओला 'अशा घटनांमुळे आपल्याला प्रश्न पडतो की, असं केल्याने पुरुषांना यातून काय मिळतं? "आम्ही असाय्य आहोत आणि ते आनंद घेतात, असं प्रियाने सांगितलं." प्रियाचं हे वक्तव्य खूप धक्कादायक आहे. अनेकांनी प्रियाच्या या व्हिडीओवर कमेंटव्दारे आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. एकाने कमेंट करत लिहीलंय, ''सर्वात वाईट भावना म्हणजे असहाय्य असणं.'' तर अजून एकाने म्हटलंय, ती आरोप करत नाहीये किंवा खोटं बोलत नाहीये.  ती कटू सत्य शेअर करत आहे जे घडले ते सांगत आहे.  अशी घटना  सुष्मिता सेनसोबत घडली होती ज्यावेळी ती 14,15 वर्षांची होती. अशा अनेक प्रकारच्या कमेंट युजर्स या व्हिडिओवर करत आहेत.