मुंबई : कॉमेडियन राजू श्रीवास्तवची प्रकृती बऱ्याच दिवसांपासून खालावली होती. त्यानंतर त्याला आता शुद्ध आली आहे. आणि आता पुन्हा एकदा अशी बातमी समोर आली आहे की, त्याची प्रकृती पुन्हा बिघडली आहे. पण आता त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचीही बातमी समोर आली आहे. या वृत्तानंतर कुटुंबासह चाहत्यांनीही सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एनआयने राजू श्रीवास्तवच्या प्रकृतीची माहिती दिली आहे. त्याने लिहिलं आहे की, 'राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीत किंचित सुधारणा झाली आहे.' तरीही तो व्हेंटिलेटरवर असून निरीक्षणाखाली आहे. काही काळापूर्वी कॉमेडियनचा पीआरओ गरवीत नारंगने माहिती दिली होती की, राजूला पुन्हा व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे, त्याला खूप ताप आहे. त्यानंतर डॉक्टरांनी हा निर्णय घेतला आहे. जरी तो शुद्धीवर आला आहे. काही दिवसांपूर्वी राजू श्रीवास्तव शुद्धीवर आल्याची बातमी आली होती.


राजू श्रीवास्तवला आला होता हार्टअटॅक
कॉमेडियन आणि उत्तर प्रदेश चित्रपट विकास परिषदेचा अध्यक्ष राजू श्रीवास्तवला १० ऑगस्ट रोजी हृदयविकाराच्या झटक्याने दिल्लीतील एम्समध्ये दाखल करण्यात आलं होतं. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. राजू श्रीवास्तव अजूनही कोमात असल्याची माहिती मिळाली. राजूची प्रकृती सुधारण्यासाठी न्यूरोफिजिओथेरपीची मदत घेतली जात आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, राजूच्या मेंदूच्या तीनपैकी एका नसमध्ये अजूनही ब्लॉक आहे.



राजू श्रीवास्तव यांनी कॉमेडीयन म्हणून खूप नाव कमावलं आहे. अनेक टीव्ही शोमध्येही तो दिसला आहे. सोशल मीडियावरही त्याची फॅन फॉलोइंग खूप जास्त आहे. चाहत्यांना प्रत्येक क्षणी त्यांच्या तोंडून काहीतरी ऐकायचे असते, जे चाहत्यांच्या चेहऱ्यावर हास्य आणते. त्यांनी अनेक बड्या स्टार्ससोबत काम केले आहे आणि त्यामुळेच तो आज लाखो लोकांच्या हृदयावर राज्य करत आहे.