मुंबई : 24 वर्ष अगोदर 'विजयपथ' या सिनेमातील तब्बूच्या गाण्याने धुमाकूळ घातला होता. ते गाणं होतं 'रूक रूक रूक अरे बाबा रूक...' आता हे गाणं वेगळ्या अंदाजात काजोल "हेलीकॉप्टर इला' या सिनेमातून घेऊन आली आहे. तब्बूने जेव्हा काजोलच्या गाण्याचं हे वर्जन ऐकलं तेव्हा तिची रिअॅक्शन धक्कादायक होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या गाण्याची गोष्ट अशी आहे की, तब्बूने काजोलचा नवरा अजय देवगनला थांबवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र हे नवं वर्जन तब्बूने ऐकलं तेव्हा ती थक्क झाली. या गाण्यावर तब्बूने त्या काळी खूप वेगळा हटका अंदाज दाखवला होता. मात्र गाण्याच्या माध्यमातून काजोल वेगळी समोर आली आहे. 


हे गाणं ऐकताच तब्बूच्या चेहऱ्यावर स्मित हास्य केलं. त्यानंतर तब्बू म्हणाली की, हे गाणं वास्तवातच चांगल आणि सुंदर आहे. या गाण्यात काजोल खूप क्यूट दिसत आहे. असं वाटतं की तिच्यासाठीच हे ट्रक तयार केला आहे. सर्वात चांगली गोष्ट ही आहे की, या गाण्याला अधिक छेडलेलं नाही. त्या गाण्याचा आत्मा तोच आहे फक्त रंग - रुप बदलण्यात आलं आहे.