हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांच्या लग्नातील `तो` किसा, ज्यासाठी उचललं टोकाचं पाऊल
लग्नाच्या 42 वर्षाच्या वाढदिवसानिमित्त आज आम्ही तुम्हाला त्यांच्या प्रेम कहाणीमधील एक किस्सा सांगणार आहोत.
मुंबई : बॉलिवूडची आवडती जोडी हेमा मालिनी आणि धर्मेद्र यांच्या लग्नाला आज म्हणजे 2 मे ला 42 वर्ष पूर्ण झाली आहेत. या जोडीने अनेक हीट चित्रपट दिले आहेत. हेमा मालिनी धर्मेंद्र लव्ह स्टोरी आजही चर्चेत आहे, ज्यामुळे त्यांना एव्हरग्रीन कपल म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. कारण त्यांच्या लग्नाचे किस्से हे खूपच फिल्मी आणि रोमांटीक आहेत.
त्यांच्या लग्नाच्या 42 वर्षाच्या वाढदिवसानिमित्त आज आम्ही तुम्हाला त्यांच्या प्रेम कहाणीमधील एक किस्सा सांगणार आहोत.
असे सांगितले जाते की, हेमा मालिनी यांच्याशी रोमान्स करण्यासाठी धर्मेंद्र हे एक अनोखा मार्ग स्वीकारायचे, हेमा मालिनी यांच्यासोबत रोमान्स करण्यासाठी धर्मेंद्र स्वत:च्याच चित्रपटाच्या कॅमेरामनला लाच देत असत, जेणेकरून त्यांना अभिनेत्रीसोबत जास्त वेळ घालवता यायचा.
हेमा मालिनीसोबत लग्न करणं धर्मेंद्र यांच्यासाठी सोपं नव्हतं, कारण त्यांचा आधीच एक विवाह झाला होता. त्यांच्या पत्नीने धर्मेंद्रला घटस्फोट देण्यास देखील नकार दिला. परंतु धर्मेंद्र यांना काहीही करुन लग्न करायचंच होतं, म्हणून मग त्यांनी इस्लाम धर्म स्वीकारला.
21 ऑगस्ट 1979 रोजी धर्मेंद्र आणि हेमा मालिनी या दोघांनीही इस्लाम स्वीकारत त्यांची नावे बदलली. धर्मेंद्र यांचे नाव बदलून दिलावर खान ठेवण्यात आले आणि हेमा यांचे नाव आयेशा बी ठेवण्यात आले आणि त्यानंतर दोघांनी लग्न केले, हेमा आणि धर्मेंद्र यांना ईशा आणि आहाना या दोन मुली आहेत.