मुंबई : अभिनेत्री हेमा मालिनीने एका मुलाखतीदरम्यान तिच्या अफगाणिस्तान प्रवासाचा अनुभव सांगितला आहे. तिने काबूलला 'सुंदर' असेही म्हटले आणि सांगितले  की तिने बामियान, खैबर पास आणि बँड-ए-अमीरचा प्रवास केला आहे. हेमा मालिनी म्हणाली की तिने एका ढाब्यावर कांद्यासह 'रोटी' देखील खाल्ली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अफगाणिस्तानतील हेमा मालिनीचा पहिला बॉलिवूड सिनेमा


हेमा मालिनी तिच्या 1975 च्या धर्मात्मा चित्रपटाच्या शूटिंगसाठी अफगाणिस्तानात गेल्या होत्या. त्या देशात चित्रीत झालेला हा पहिला बॉलिवूड चित्रपट होता. फिरोज  खान, रेखा, प्रेमनाथ, डॅनी डेन्जोंगपा, फरीदा जलाल, रणजित, हेलन इत्यादी कलाकारांचा समावेश होता. चित्रपटाचे हिट गाणे क्या सुंदर लगती हो देखील तेथे शूट  करण्यात आले.


काबूल सुंदर ठिकाण- हेमा मालिनी


तिच्या प्रवासाची आठवण करून देताना हेमा म्हणाली, "मला माहित असलेला काबूल खूप सुंदर होता आणि तिथे मला खूप छान अनुभव आला. आम्ही काबूल  विमानतळावर उतरलो होतो, जे त्यावेळी मुंबई विमानतळाइतके लहान होते आणि आम्ही जवळच्या हॉटेल मध्ये राहिलो. 


पण अखेरीस आम्ही आमच्या शूटसाठी बामियान आणि बँड-ए-अमीर सारख्या ठिकाणी प्रवास केला आणि परतीच्या वाटेवर आम्ही तालिबानीसारखे दिसणारे लांब  कुर्ते आणि दाढी असलेले हे लोक पाहिले. त्यावेळी अफगाणिस्तानात रशियनही एक शक्ती होती. "