Hemangi Kavi Birthday : हेमांगी कवी आपल्या बोल्ड आणि बिनधास्त व्यक्तिमत्त्वासाठी ओळखली जाते. तिचे सोशल मीडियावरही अनेक फॅन्स आहेत. मराठी चित्रपट, मालिका आणि नाटक, जाहिराती अशा अनेक माध्यमांतून ती प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. 'जे जे स्कूल ऑफ आर्ट्स' मधून तिनं शिक्षण घेतले आहे. 'ती फुलराणी' हे हेमांगीचे गाजलेले नाटक प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. त्यामुळे तिची चांगलीच चर्चा रंगलेली असायची. सध्या ती सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह असते. ती आपले अनेक विविध रिल्स, व्हिडीओ आणि फोटोही सोशल मीडियावर शेअर करताना दिसते. त्यामुळे तिची चांगलीच चर्चा रंगलेली असते. मध्यंतरी ती 'बाई, बुब्स आणि ब्रा' ही सोशल मीडियावर पोस्ट चांगलीच व्हायरल झाली होती. तेव्हा माध्यमांमध्ये फक्त आणि फक्त तिचीच चर्चा होती. विनोदी भुमिका आणि गंभीर भुमिकाही ती फार उत्तमप्रकारे करते. सोशल मीडियावरही तिचे असंख्य तरूण फॉलोवरर्स आहेत. आज हेमांगीचा वाढदिवस आहे. सध्या तिची चांगलीच चर्चा रंगली आहे. 


हेमांगी कवी आणि फीटनेस 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हेमांगी कवी ही सोशल मीडियावर सक्रिय असते. तिचे व्हिडीओही सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होताना दिसतात. योगा, जीम ती नियमितपणे करताना दिसते. त्यामुळे तिची चांगलीच चर्चा रंगलेली असते. हेमांगी कवी ही जेवढी स्टायलिस्ट असते तेवढीच ती फार स्टायलिशही आहे. अनेकदा ती तिचे ग्लॅमरस फोटोही शेअर करते. 


काय होती 'बाई बुब्स आणि ब्रा' पोस्ट?


2020 च्या काळात एका अभिनेत्रीच्या पोस्टनं सगळीकडेच खळबळ माजवून दिली होती आणि ती म्हणजे हेमांगी कवी हिच्या पोस्टची. यावेळी 'बाई बुब्स आणि ब्रा' या तीन शब्दांनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते. हा कुठला चित्रपट नव्हता तर एक वास्तवदर्शी पोस्ट होती. ज्याबद्दल तिनं भरभरून लिहिलं होतं. या पोस्टपुर्वी तिचा एका व्हिडीओ तिनं शेअर केला होता. त्यावेळी तिला तिच्या वेशभुषेवरून, तिच्या प्रेझेंट राहण्यावरून खूप ट्रोल करण्यात आले होते. त्यावरून तिनं ही पोस्ट शेअर केली होती. यावरून स्त्रियांच्या शरीरावरून आक्षेपार्ह विधानं करणाऱ्या ट्रोलर्सना तिनं सडेतोड उत्तर या पोस्टवरून दिले होते. स्त्रियांनी ब्रा घालावी की नाही यावरही या पोस्टमधून संदेश जात होता. 


'ती फुलराणी'


'ती फुलराणी' हे ज्येष्ठ लेखक पु.ल.देशपांडे यांचे सर्वात लोकप्रिय नाटकं. या नाटकातून ज्येष्ठ अभिनेत्री भक्ती बर्वे, मग अभिनेत्री अमृता सुभाष आणि हेमांगी कवी अशा हरहुन्नरी अभिनेत्रींनी फुलराणीची भुमिका साकारली होती. तिच्या नाटकालाही प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. 


'गेटवे ऑफ इंडिया, चहा आणि हेमांगी कवी'


हेमांगी कवी हिनं ताजमधला चहा प्यायला होता. त्यामुळे तिची चांगलीच चर्चा रंगलेली होती. त्यावेळी तिनं एक पोस्ट शेअर केली होती ज्यात तिनं फार मोठी भावूक पोस्ट लिहिली होती. 



तिच्या या पोस्टवर अनेकांनी खूप भल्यामोठ्या कमेंट्सही केल्या होत्या.