मुंबई : यंदाची दिवाळी अभिनेत्री हेमांगी कवी-धुमाळ साठी अतिशय खास आहे. हेमांगी कवीने यंदाची दिवाळी आपल्या नवीन घरात साजरी केली आहे. याचा आनंद गगनात मावत नाही. हेमांगीने सोशल मीडियावर हा आनंद व्यक्त केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'गृहप्रवेश' केल्याचं म्हणतं हेमांगीने आपल्या नवीन घराचे फोटो शेअर केले आहे. 'Happy Days' म्हणतं हेमांगी कवी आपला आनंद व्यक्त करत आहे. हेमांगीचे पती संदीप धुमाळ हे सिनेमाटोग्राफर आहे. त्यांच्या आणि हेमांगीच्या कल्पनेतून हे घर साकारलं आहे. 


हेमांगी कवीची इंस्टा पोस्ट


नव्या नवलाईने गृहप्रवेश हो झाला
क्षण एकच पण नाविण्याचा झाला


मुंबई सारख्या ठिकाणी घर घेणं आमच्या सारख्यांना अशक्य आहे हे खूप आधीच आमच्या लक्षात आलं होतं. म्हणून मग 'म्हाडा' मध्ये सलग 8 वर्ष प्रयत्न केल्यावर एकदाची 2016 मध्ये मला lottery लागली आणि बोरीवलीत आम्हांला घर लाभलं. तोपर्यंत आम्ही भाडेतत्त्वावर कधी दादर तर कधी दहिसर मध्ये रहायलो.
पण प्रत्यक्षात घर हातात यायला नोव्हेंबर 2019 उजाडलं. Possession चे सर्व तांत्रिक सोपस्कार आटपून आणि आम्हांला हवी तशी सजावट करून घेऊन फेब्रुवारी मध्ये आम्ही आमच्या हक्काच्या घरात 'गृहप्रवेश' केला! त्यावेळी आम्ही दोघे ही मालिकांमध्ये प्रचंड व्यस्त होतो आणि नंतर मार्च मध्ये कोरोनामुळे आम्ही गावी निघून गेलो. 4 महिने साताऱ्याला राहून आम्ही जून मध्ये आमच्या या नवीन घरात परतलो. पण मग जून पासूनच पुन्हा कामं सुरू झाली आणि आम्ही वेगवेगळ्या शहरात shooting साठी निघून गेलो. त्यामुळे खूप काळ आम्हांला आमच्या या नवीन घरात राहायलाच मिळालं नाही किंवा कुठलेच सण नीटसे साजरे करता आलेच नाहीत. पण मग यावेळी मात्र काहीही झालं, कितीही busy असलो तरी 'दिवाळी' सुट्टी घेऊन आपल्या या पहिल्यावहिल्या, नवीन, हक्काच्या घरात साजरी करायचीच असं ठरवून टाकलं. So, यंदाची आमची दिवाळी, आमचा पाडवा या नवीन, हक्काच्या घरात साजरा करतोय! तुमचे आशीर्वाद असू द्यात!, असं म्हणतं हेमांगीने आपल्या नवीन घराचा आनंद शेअर केला आहे. 



प्रत्येकाला मुंबईत आपलं हक्काचं स्वतःच घर असावं असं वाटत असतं. त्यामुळे हेमांगीचं हे स्वप्न पूर्ण झालं आहे. याचा आनंद तिने सगळ्यांसोबत शेअर केला आहे.