मुंबई : कलाविश्वात असे अनेक कलाकार आहेत, जे अनेक मुद्द्यांवर आपलं ठाम मत मांडत असतात. यामुळे ते अनेकदा वादाच्या भोवऱ्यात देखील अडकतात. अशाच कलाकारांपैकी एक म्हणजे अभिनेत्री हेमांगी कवी (Hemangi Kavi). आपल्या अभिनयाने आणि विनोदीबुद्धीनं चाहत्यांचं मनोरंजन करणारी हेमांगी पुन्हा एका पोस्टमुळे चर्चेत आली आहे. ( hemangi kavi latest video) आता हेमांगीने स्वतःचा एक फोटो पोस्ट करत कॅप्शनमध्ये विवाहित महिलांच्या मनातील भावना सांगण्याचा प्रयत्न हेमांगी फेसबुकच्या माध्यामातून केला आहे. (hemangi kavi post)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


काय म्हणाली हेमांगी? (What did Hemangi say?)
Tell me you are माहेरवाशीण
Without telling me you are माहेरवाशीण! 
Western कपड्यांवर ही जिच्या कपाळी हळद कुंकु दिसतं तिला माहेरवाशीण समजावं! 
मुलगी,सुन 4 दिवस माहेरी/सासरी राहून आपल्या घरी निघाली की तिला हळद- कुंकू लावायचं! हे मी लहानपणापासून बघत आलेय.
लहानपणी आईने घरी आलेल्या पाहुण्यांना हळद- कुंकू लावलं की आम्हांला ही लावायचं हा नियमच होता! ते काय वय नव्हतं पण लहान मुलींच्या हट्टासमोर कुणाचं काय चालतंय? म्हणून माझी आई ही लावायची.
काय अप्रूप होतं काय माहीत पण मज्जा यायची. कदाचित आपण ही मोठे झालो आहोत हं, आता मला ही सगळं कळतं बरं का हे समजायची आणि दाखवण्याची हौस असावी. पण मुलींना एक खोड असतेच, त्यांना लवकर मोठ्ठं व्हायची घाई असते! मग कुठं आईच्या साड्या नेस, आईचं मंगळसुत्र घाल, चपला घाल, खेळात आईच हो!
तेव्हा वाटायचं कध्धी एकदाचे मोठे होतोय आणि आता वाटतंय…. Yes exactly हे वाचत असताना तुम्ही मनातल्या मनात जे म्हणालात ना तेच वाटतंय...
तर आता खरंच मोठं झाल्यावर त्या हळदी कुंकूचा हट्ट नाही राहीला पण तुम्ही त्याला परंपरा म्हणा, संस्कृती म्हणा किंवा अगदी लागलेली सवय म्हणा घरातून बाहेर पडताना कपाळावर लागलेले हे दोन रंग
अजूनही मज्जाच आणतात.


सध्या हेमांगीची पोस्ट तुफान व्हायरल होत आहे. हेमांगी कायम स्वतःला खटकलेल्या आणि अनुभवलेल्या गोष्टींवर स्वतःचं मत मांडत असते. ज्यामुळे तिला अनेकदा ट्रोलिंगचा सामना देखील करावा लागतो. पण ट्रोल (hemangi kavi troll) करणाऱ्यांना हेमांगी फारसं महत्त्व देत नाही.