मुंबई : कलाविश्वात अनेक कलाकार सामाजीक किंवा त्यांच्या आयुष्यातील खास आठवणींबद्दल सांगत असतात. अशावेळेस सोशल मीडिया एक उत्तम मध्यम असतं. कारण कलाकारांना थेट चाहत्यांसोबत संवाद साधता येतो. अशाच अभिनेत्रींपैकी एक म्हणजे हेमांगी कवी. हेमांगी कायम तिला आलेल्या अनुभवाबद्दल किंवा तिच्या जीवनाशी निगडीत गोष्टीबद्दल सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगत असते. आता अभिनेत्रीने तिच्या लहानपणीची एक आठवण चाहत्यांसोबत शेअर केली आहे. एवढंच नाही तर हेमांगीची पोस्ट वाचल्यानंतर तुम्हाला देखील तुमच्या लहानपणीच्या आठवणी ताज्या होतील. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नुकतंच हेमांगीने फेसबुकवर काही फोटो पोस्ट केले आहेत. यात तिने लाल रंगाचा एक ड्रेस घातला आहे. लाल रंगाच्या ड्रेसमध्ये वेग-वेगळ्या अंदाजात पोज देत अभिनेत्रीने तिच्या लहानपणातील लाल रंगाचं महत्त्व सांगितलं आहे. 


हेमांगी पोस्ट करत म्हणते... 
“लहानपणी (अलीकडे या शब्दाचा वापर अधिक व्हायला लागलाय.. हे लक्षात आलंय माझ्या) तर माझ्या लहानपणी मला कुणी विचारलं की ” तुझा आवडता रंग कुठला?” तर मी म्हणायचे ‘लाल’. ठरलेलं उत्तर.



 या रंगाबद्दल कधी एवढं आकर्षण निर्माण झालं माहीत नाही पण solid आवडायचा हा रंग. तुम्हांला खोटं वाटेल पण माझ्याकडे 90 % गोष्टी लाल रंगाच्या असायच्या! कपडे, पेन, शाई, दप्तर, water bottle म्हणजे u name it आणि माझ्याकडे ते लाल रंगाचं असायचं!


अरे हो! रक्ताचा रंग लाल, हृदयाचं चित्र काढलं तर ते लाल, गुलाब लाल, जास्वंद लाल, प्रेमाचा रंग लाल, जगात सगळ्यात भारी रंग म्हणजे लाल असला बालिश युक्तिवाद मी मांडायचे! अजूनही shopping ला गेलं की माझा पहिला हात लाल रंगाच्या वस्तू, कपड्यांकडे जातो! College ला गेल्यावर तर काय रंगच रंग, अनेक छटा, पोत पण तरीही लाल रंगाची जागा ही वेगळीच होती.


काही वर्षांनी ती जागा काळ्या रंगाने घेतली. मला वाटलं चला लालचा सोस सुटला पण नाही!!! कितीही ठरवलं नाही घ्यायचा लाल रंग तरीही कुठल्या ना कुठल्या मार्गे हा लाल रंग शिरतोच माझ्या आयुष्यात! काय करणार… मेरा पेहला प्यार जो है!


मित्र परिवार गमतीत म्हणतात ‘म्हणूनच तू लाला नावाच्या माणसाशी लग्न केलंस!’ असं म्हणतात लाल रंग सावळ्या रंगाला शोभत नाही! मला हे कधीच पटलं नाही! मुळात कुठलाही रंग जर आपण नीट carry केला तर तो छानच दिसतो आणि त्यात जर आपला आवडता रंग असेल तर आपण ‘कमालच’ दिसतो! हो की नाही?


त.टी. : लाल रंग म्हणजे ‘Danger’ असं ही म्हणतात याची मंडळाने नोंद घ्यावी… तेव्हा comment करायच्या आधी सावधानी बाळगा! एक निर्धारीत सूचना!”, असे हेमांगी कवीने म्हटले आहे. 


सध्या हेमांगीची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. अभिनेत्रीच्या पोस्टवर अनेकांच्या लाईक्स आणि कमेंट येत आहेत.