Hemangi Kavi Video: अभिनेत्री हेमांगी कवी ही आपल्या नानाविध पोस्टमुळे चर्चेत असते. आपल्या अशाच काही वेगवेगळ्या पोस्टनं ती आपल्या चाहत्यांना अपडेट ठेवत असते. सध्या तिचा असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर ट्रेण्ड होतो आहे. या व्हिडीओमुळे ती चांगलीच चर्चेत आली आहे. कलाविश्वात किंवा आजूबाजूला कुठेलीही घटना घडली की हेमांगी ही त्याच्यावर उघडपणे बोलताना दिसते त्यामुळे तिच्या पोस्टचीही चांगलीच चर्चा होतो. आताही तिच्या एका व्हिडीओची चर्चा आहे. यामध्ये ती एका मल्टिप्लेक्समध्ये बसलेली दिसते आहे. सोबतच तिनं 3D ग्लासेस लावायचा प्रयत्न करते आहे. परंतु त्याचसोबत तिचा चष्मा लावून थ्रीडी ग्लासेस लावण्याचा स्ट्रगल सुरू असलेला दिसतो आहे. त्यावर तिनं कॅप्शन दिलंय की, स्ट्रगल्स आफ्टर 40!


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तिचा हा एक फनी व्हिडीओ आहे. चाळीशी उलटल्यानंतर कोणत्या कोणत्या आव्हानांना सामोरे जावे लागते याबद्दल तिनं यावेळी गमतीदार व्हिडीओ केला आहे. हा व्हिडीओ तिनं तिला उद्देशून केला आहे की इन-जनरल, यावर चर्चा होऊ शकते परंतु अनेकांना या वयानं चष्माही लागतो असं समजलं किंवा ज्यांना चष्मा असतो त्यांना तर 3D गोग्लस घालणं फार कठीण होऊन जातं कारण अशावेळी त्यांना आपल्या चष्माही सांभाळायचा असतो आणि सोबतच त्यांना 3D चष्म्यातून मजाही घ्यायची असते. अशावेळी त्यांच्यासाठी हा एक मोठा स्ट्रगलच असतो. त्यावर तिनं हा व्हिडीओ केला आहे. आधी ती साधा चष्मा घालते आणि मग ती थ्रीडी चष्मा घालते. त्यामुळे तिचा हा स्ट्रगल पाहून नेटकऱ्यांनी अनेक प्रतिक्रियाही दिल्या आहेत. 


वयाच्या चाळीशीनंतर आपली कशी अवस्था होते याबद्दल तिनं सांगितलं आहे. यावेळी तिनं कॅप्शनमध्ये लिहिलंय की, ''दुख, दर्द, पीडा! लेकिन कोई नहीं फिल्म ज्यादा पीडादायक निकली! Btw, Guess d film?'' तिच्या या पोस्टवर नेटकऱ्यांच्या नानाविध प्रतिक्रिया येताना दिसत आहेत. त्यामुळे तिच्या या व्हिडीओची चांगलीच चर्चा रंगली आहे. काहींनी कमेंट केलीये की, फक्त 40 शीच काय आता तर आम्हाला विशीत असल्यापासूनच फार त्रास होतो आहे. तर काहींनी म्हटलंय की, काहीतरीच. या वयात काही असं होतं नाही.


हेही वाचा  - सई ताम्हणकर बॉयफ्रेंडसोबत जगातील 'या' सुंदर देशात, रोमॅण्टिक फोटो व्हायरल


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


तर एका युझरनं लिहिलंय की, ''Solid ideas सुचतात ताई तुला... योग्य ठिकाणी योग्य situations आणि emotions व्यक्त करतेस... तुस्सी छा gaye''. तर अनेकांना तिचा हा व्हिडीओ फार आवडला आहे.