Hera Pheri 3 : 2000 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'हेरा फेरी' (Hera Pheri)  या चित्रपटाला प्रेक्षक आजही आवडीनं पाहतात. या चित्रपटामधील अक्षय कुमार (Akshay Kumar),सुनील शेट्टी (Suniel Shetty) आणि परेश रावल (Paresh Rawal) या त्रिकुटाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. यानंतर ‘हेरा फेरी 3’ची घोषणा झाल्यापासूनच प्रेक्षक या चित्रपटाची अपडेट जाणून घेण्यासाठी अतिशय उत्सुक आहेत. 'हेरा फेरी 3' संदर्भात अनेक अपडेट्स सध्या सातत्याने समोर येत आहेत. आता या चित्रपटाची शूटिंग सुरू झाल्याची अपडेट नुकतीच समोर आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'हेरा फेरी' नंतर 'फिर हेरा फेरी' (Phir Hera Pheri) हा दुसरा भाग 2006 मध्ये रिलीज झाला. या सिक्वेलला देखील प्रेक्षकांची पसंती मिळाली.  आता या चित्रपटाचा तिसऱ्या भागाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत होते. 'हेरा फेरी 3' (Hera Pheri-3) च्या शूटिंगला सुरुवात झाली असून या चित्रपटात अभिनेता कार्तिक आर्यन हा प्रमुख भूमिका साकारणार आहेत, असं म्हटलं जात होतं.



तो राजू ही भूमिका साकारणार आहे, अशी चर्चा होती. पण आता राजू ही भूमिका अक्षय कुमारच (Akshay Kumar) साकारणार आहे, अशी माहिती समोर येत आहे. नुकतीच अक्षय कुमारने 'हेरा फेरी 3'मध्ये काम करण्यासाठी चित्रपट निर्मात्यांची भेट घेतली होती. मुंबईच्या एम्पायर स्टुडिओमध्ये फिरोज नाडियादवाला यांची सुनील शेट्टी, अक्षय कुमार आणि परेश रावल यांच्यासोबत बराच वेळ मिटिंग झाली. त्यानंतर आता या चित्रपटाचे शूटिंग देखील सुरू झाले आहे असल्याची माहिती मिळत आहे.   


वाचा: अजय-काजोलच्या लेकीचं हिंदी ऐकूण नेटकरी हैराण, पाहा VIDEO 


दरम्यान चित्रपटाचा पहिला भाग 2000 मध्ये आला होता, तर दुसरा भाग 2006 मध्ये आला होता. आता 17 वर्षांनंतर या चित्रपटाचा तिसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. हेरा फेरी या चित्रपटात बाबू भैय्या ही भूमिका परेश रावल यांनी साकारली तर श्‍याम ही भूमिका सुनील शेट्टीनं साकारली आहे. चित्रपटात राजू ही भूमिका अक्षयनं साकारली आहे.



तसेच काही महिन्यांपूर्वी एका मुलाखतीमध्ये परेश रावल यांना प्रश्न विचारण्यात आला की, ''हेरा फेरी', 'अंदाज अपना अपना' या चित्रपटांचे सिक्वेल कधी रिलीज होणार? या सिक्वेलनमध्ये काम करण्यासाठी तुम्ही किती एक्सायडेट असाल?' या प्रश्नाला परेश यांनी उत्तर दिलं, 'मला जर पुन्हा धोती आणि चष्मा घालून तशी भूमिका करावी लागली तर मी फक्त पैशांसाठी एक्सायडेट असेल, त्यापेक्षा जास्त कोणत्याही गोष्टींसाठी एक्सायडेट नसेल.' अशी प्रतिक्रिया बाबू भैय्या म्हणजेच परेश रावल यांनी दिली आहे.