Akshay Kumar : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारच्या फ्लॉप चित्रपटांची मालिका 'बच्चन पांडे' या चित्रपटापासून सातत्याने सुरु आहे. गेल्या दोन वर्षांमध्ये 'सरफिरा' आणि 'बड़े मियाँ छोटे मियाँ'सह अभिनेत्याचे 8 चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरले होते. आता अक्षय कुमारचा 15 ऑगस्टला या वर्षातील तिसरा चित्रपट 'खेल खेल में' प्रदर्शित होणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या अभिनेता अक्षय कुमार हा बॉक्स ऑफिस रेकॉर्डवर फ्लॉप हिरो म्हणून ओळखला जातो. परंतु आपण हे विसरू नये की 90 च्या दशकात अक्षय कुमारने अशा सुपरस्टार्सपैकी एक होता, ज्यांच्या चित्रपटांनी कमाईच्या बाबतीत शाहरुख खानला देखील मागे टाकले होते. सलमान खान आणि आमिर खान सारख्या बड्या कलाकारांना त्याने कमाईमध्ये मागे टाकले होते. 


अक्षय कुमारचे फ्लॉप चित्रपट


अक्षय कुमारचा शेवटचा सर्वात हिट चित्रपट 2021 मध्ये प्रदर्शित झाला होता. ज्याचे नाव होते 'सूर्यवंशी'. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 196 कोटींची कमाई केली होती. त्यानंतर 2022 मध्ये अक्षय कुमार एकही हिट चित्रपट देऊ शकला नाही. त्याचे 4 चित्रपट फ्लॉप ठरले. 


अक्षय कुमारचे 90च्या दशकातील हिट चित्रपट


अक्षय कुमारने 1991 साली सौगंध या हिंदी चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत मुख्य अभिनेता म्हणून प्रवेश केला. यानंतर 90 च्या दशकात अक्षय कुमारच्या या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर प्रचंड खळबळ माजवली होती. अक्षय कुमारचा 1992 मध्ये आलेला 'खिलाड़ी' हा चित्रपट खूप हिट ठरला. या चित्रपटामधून अक्षय कुमारला खिलाडी असा टॅग मिळाला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 4 कोटींची कमाई केली होती. त्यानंतर 1994 मध्ये रिलीज झालेल्या 'मोहरा' चित्रपटाने अक्षयला सुपरस्टार बनवले. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 12.01 कोटी रुपयांची कमाई केली.


 त्यानंतर अक्षय कुमार सैफ अली खानसोबत 'मैं खिलाड़ी तू अनाड़ी' या चित्रपटात दिसला. या चित्रपटाने प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले. या चित्रपटाने 7.88 कोटींची कमाई केली. 1995 मध्ये अक्षय कुमारचा 'सबसे बड़ा खिलाड़ी' हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाने देखील 9.40 कोटी रुपयांची कमाई केली. या चित्रपटानंतर अक्षयचा 'खिलाड़ियों का खिलाड़ी' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर खूपच हिट ठरला. या चित्रपटाने देखील 14.39 कोटी रुपयांची कमाई केली.