मोदी सरकारच्या बजेटवर बॉलिवूडची रिअॅक्शन
अरूण जेटलीने येत्या आर्थिक वर्षाचं बजेट गुरूवारी सादर केलं.
मुंबई : अरूण जेटलीने येत्या आर्थिक वर्षाचं बजेट गुरूवारी सादर केलं.
सिनेमासृष्टीदेखील कायम या बजेटला घेऊन उत्सुक असते कारण यातून त्यांना टॅक्समधून सवलत मिळणार असते. अनेकदा इंडस्ट्रीतील लोकं बजेटमुळे भरपूर खूष असतात तर कधी वाटतं सिने कलाकार देखील सामान्यांप्रमाणे नाखूष आहे.
मोदी सरकार आल्यानंतर जेवढे वेळा बजेट सादर झालं आहे तेवढ्या वेळेला इंडस्ट्रीने रिअॅक्ट केलं आहे. फिल्म इंडस्ट्रीला कायम आशा असते की सरकार सिनेमा बिझनेसला विचारात घेऊन घोषणा करेल. काही वेळेला इंडस्ट्रीला दिलासा देणारं बजेट राहिलं आहे.
2017 मध्ये मुकेश भट्ट यांनी जीएसटी लागल्यानंतर म्हटले होते की आम्ही गँबलिंग आणि तंबाखूपेक्षा वेगळे आहोत. अशावेळी सरकारने आम्हाला पान आणि गुटखा इंडस्ट्री सारखे ट्रिट करू नये. जीएसटी लागल्यानंतर मनोरंजन कर 28 टक्के झाला होता. या कराला छोट्या फिल्ममेकरने देखील विरोध केला होता. आता जीएसटी 18 टक्के करावी अशी मागणी केली जात आहे.
बॉलिवूडमधील लोकं अर्थमंत्री अरूण जेटली यांनी 2016 मध्ये सादर केलेल्या बजेटमुळे आनंदी नव्हते. टॅक्ससंदर्भात कलाकार जास्त नाराज होते. तेव्हा गायक कैलास खेरने सांगितलं होतं की सरकार परफॉर्मरकडून कोणतंही टॅक्स घेऊन नये.