मुंबई : अभिनेता सलमान खान हा बॉलिवूडचा दाबंगस्टार म्हणून ओळाखला जातो. बॉक्सऑफिसवर कोट्यांची कमाई करणारा सलमान खान चित्रपटासाठी आणि अनेक जाहिरातींसाठीही मोठी किंमत घेतो. पण वास्तावात सलमान खानकडे किती पैसा येतो ? हे तुम्हांला ठाऊक आहे का ? सलमान खानने त्याच्या आर्थिक व्यवहाराबद्दल काही दिवसांपूर्वी खुलासा केला आहे. 


सलमान खानकडे केवळ 10 % रक्कम 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अभिनेता सलमान खान त्याच्या चित्रपटाच्या मध्यमातून 300 कोटींच्या पलिकडेही कमाई करत असला तरीही तो स्वतःकडे केवळ 10% रक्कम ठेवतो. इतर सारा पैसा चॅरिटी आणि टॅक्समध्ये जात असल्याची माहिती सलमान खानने दिली आहे. 


मुलाखतीमध्ये दिली माहिती  


एका मुलाखतीमध्ये सलमान खानने त्याला मिळणार्‍या मानधनाचे तो काय करतो? असा प्रश्न विचारल्यानंतर त्याने 90 % पैसा हा चॅरिटी आणि टॅक्समध्ये जात असल्याचे म्हटले आहे. 



 


असं सुरू झालं 'बीईंग ह्युमन'  


सुरूवातीच्या काळात जेव्हा लोकं मदत मागण्यासाठी येत होते तेव्हा सलीम खान  चेक साईन करत होते. तेव्हा वाईट वाटायचं. कालांतराने अधिकाधिक काम करण्यास सुरूवात केली. यामधूनच बीईंग ह्युमनची सुरूवात झाली. रेस्टॉरंट सुरू झाले. यामधून मिळणारा नफा पूर्णपणे चॅरिटीसाठी वापरला जातो. 


सलमान खान यंदा घेऊन येणार रेस 3


दरवर्षी ईद, सलमान खान आणि बॉक्स ऑफिस हे समीकरण ठरलेलं असतं. यंदा सलमान खान 15 जूनला म्हणजेच ईदच्या दिवशी 'रेस 3' हा अ‍ॅक्शनपट  घेऊन येणार आहे. नुकतीच सलमान खान ट्विटरच्या माध्यमातून या चित्रपटातील सार्‍या पात्रांची ओळख करून दिली. सध्या अबुधाबीमध्ये या चित्रपटाच्या अंतिम टप्प्यातील शूटिंग सुरू आहे. 'रेस 3' मध्ये डेजी शाह, अनिल कपूर, जॅकलीन फर्नांडीस, बॉबी देओल प्रमुख भूमिकेत झळकणार आहे.