Swiggy sent deliver boys at Shah Rukh Khans Home: बॉलिवूडमध्ये किंग खान अशी ओळख असलेल्या शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) मोठा चाहता वर्ग आहे. शाहरुख खान स्वत: सोशल मीडियावरुन या चाहत्यांबरोबर कनेक्टेड असतो. अगदी क्रिकेटचे सामने असो किंवा सणवार असो शाहरुख आवर्जून सोशल मीडियावरु शुभेच्छा देताना दिसतो. तसा इतर वेळीही शाहरुख आस्क एसआरके म्हणजेच #AskSRK या हॅशटॅगच्या माध्यमातून चाहत्यांशी गप्पा मारतो. चाहते हा हॅशटॅग वापरुन त्याला प्रश्न विचारतात त्या प्रश्नांना तो भन्नाट उत्तरं देतो. मात्र नुकत्याच झालेल्या अशा एका चर्चेनंतर अचानक 'स्विगी'चे (Swiggy) काही डिलिव्हरी बॉइज शाहरुखच्या बंगल्याबाहेर म्हणजे मन्नत बाहेर पोहोचले. पण असं झालं काय आणि हे डिलिव्हरी बॉइज मन्नत बाहेर का आले?


नक्की घडलं काय?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

झालं असं की, शाहरुखने 12 जून रोजी आस्क एसआरके सेशनदरम्यान मला प्रश्न विचारा असं सांगितलं. शाहरुखच्या या पोस्टवर एका चाहत्याने त्याला जेवलास का भावा? असा प्रश्न विचारला. आता अशा पोस्टवर असा प्रश्न विचारल्यावर शाहरुख सारखा मोठा स्टार याला उत्तर देईल अशी अपेक्षा कमीच. मात्र खरोखरच शाहरुखने या प्रश्नाला उत्तर दिलं. शाहरुखने फालतू प्रश्न म्हणून याकडे दुर्लक्ष करण्याऐवजी, "का भावा, तू स्विगीमध्ये आहेस का? तू पाठवशील का खाणं?" असा रिप्लाय या ट्वीटला दिला.



स्विगीने केला रिप्लाय


बरं शाहरुखने स्विगीचा उल्लेख केल्याने या ट्वीटला स्विगीच्या अधिकृत अकाऊंटवरुन रिप्लाय करण्यात आला. स्विगीने या पोस्टवर, "आम्ही स्विगीमधून आहोत, पाठवू का (खाणं)?" असा प्रश्न शाहरुखला विचारण्यात आला. 



...अन् खरंच त्यांनी डिलिव्हरी बॉइज पाठवले


शाहरुखने स्विगीच्या या पोस्टला रिप्लाय तर दिला नाही. मात्र स्विगीने रिप्लायची वाट न पाहता डिलिव्हरी बॉइजला खाणं घेऊन शाहरुखच्या घरी पाठवलं. स्वीगीने त्यांच्या ट्वीटर हॅण्डलवरुन शाहरुखच्या 'मन्नत' बंगल्याबाहेर उभ्या असलेल्या 7 डिलिव्हरी बॉइजचा फोटो पोस्ट केला. "आम्ही स्विगीवाले आहोत आणि आम्ही रात्रीचं जेवण घेऊन आलो आहोत," अशी कॅप्शन या फोटोला देण्यात आली आहे. हा फोटो सध्या चर्चेचा विषय ठरत असून स्विगीने शाहरुखच्या एका ट्वीटवरुन केलेलं हे भन्नाट मार्केटिंग अनेकांना आवडलं आहे. 



चाहत्यांनी यावरुन झोमॅटो या स्विगीच्या मुख्य स्पर्धक कंपनीला ट्रोल केलं आहे. स्विगीने मास्टर स्ट्रोक मारल्याचं अनेकांनी म्हटलं आहे. बरेच मिम्स शेअर करत झोमॅटोला ट्रोल करण्यात आलं आहे.