लवकरच बाबा होणाऱ्या कपिल शर्माचे `हे` आहेत खास प्लान
बाळासाठी उत्सुक आहे कपिल
मुंबई : कपिल शर्मा सध्या कामाबरोबरच खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत आहे. कपिल शर्माचा कॉमेडी शो टीव्हीवर खूप धम्माल करत आहे. तसेच लवकरच कपिल शर्माच्या घरी बाळाचं आगमन होणार आहे.
कपिल आणि त्याची पत्नी बाळाच्या आगमनाची जय्यत तयारी करत आहेत. कपिलची पत्नी गिन्नी चतरथ डिसेंबर महिन्यात बाळाला जन्म देणार आहे. सध्या कपिल पत्नीची खूप काळजी घेत आहे. आणि तो यामध्ये बिझी आहे.
कपिल आणि गिन्नी यांचं पहिलं बाळ डिसेंबर महिन्यात येणार आहे. यासाठी कपिलने खास तयारी केली आहे. 'द कपिल शर्मा शो' चे एपिसोड लवकर पूर्ण करण्याच्या तयारीत कपिल आहे. जेणे करून ते बाळाच्या जन्मानंतर जास्तीत जास्त वेळ हा पत्नी आणि कुटुंबाला देईल.
कपिल शर्माच्या शोमध्ये आगामी काळात अक्षय कुमार, रितेश देशमुख, कृति सेनेन, गोविंदा, मौनी रॉय, राजकुमार राव, तापसी पन्नू आणि भूमी पेडणेकर यासांरखे अनेक स्टार्स शुटिंगकरता येणार आहेत. कपिल कामासोबतच आता नवीन जबाबदारी स्विकारण्यासाठी देखील सज्ज झाला आहे. नुकतेच कपिल आणि गिन्नी बेबीमूनकरता कॅनडा जाऊन आले. याठिकाणी दोघांनी खूप खास क्षण एकमेकांसोबत घालवले.
कपिल शर्मा आणि गिन्नीचं गेल्यावर्षी लग्न झालं. या लग्नात टीव्ही, बॉलिवूड आणि पंजाबी इंडस्ट्रीमधील अनेक मंडळी उपस्थित होती. कपिलने पत्नी गरोदर असल्याची बातमी जुलैमध्ये दिली होती.