मुंबई : कतरिना कैफ बॉलिवूडच्या मोस्ट हॅपनिंग पार्टीतील गेस्ट लिस्टमध्ये होती. दीपिकासोबत कोल्ड वॉरनंतर दीपवीरने कतरिनाला पार्टीसाठी बोलावल आणि तिने देखील ही पार्टी अटेंड केली. मात्र त्या पार्टीत कतरिनाने असं काही केलं ज्यामुळे आता दीपवीरतर तिला कोणत्याच पार्टीला Invite करणार नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कतरिना बोलावल्यानंतर दीपवीरच्या रिसेप्शनला उपस्थित राहिली. तिने दीपवीरला लग्नाच्या शुभेच्छा दिल्या. खूप वेळ तिने या पार्टीत घालवला, डान्स देखील केला. असं असलं तरीही कतरिना आता त्या पार्टीत असं काही केलं की यापुढे तिला दीपवीर कोणत्याच कार्यक्रमात बोलवणार नाही. 


स्वतः कतरिनाने याचा खुलासा केला आहे. मला भीति आहे की, दीपिका, रणवीरच्या गेस्ट लिस्टमध्ये कधीच नसणार. मी तिथे असलेल्या चॉकलेटपैकी अर्धी चॉकलेट संपवून आली आहे. त्यामुळे मला भीति आहे की, यापुढे मला कोणत्याच पार्टीला Invite करणार नाही. 



दीपिका आणि रणबीर कपूरच्या नात्यात दुरावा येण्याच कारण कतरिना असल्याचं म्हटलं जातं. याकारणामुळे या दोघींमध्ये कोल्ड वॉर देखील सुरू झालं. पण दीपिकाने रणवीरशी लग्न केल्यानंतर हे कोल्ड वॉर संपवलं. लग्नानंतरच्या रिसेप्शन पार्टीत बोलवून सगळा राग दूर केला. 


एवढंच काय तर यानंतर या दोघींनी एकमेकांना इंस्टाग्रामवर फॉलो देखील केलं. आणि पुन्हा यांच नातं सुरळीत होत असताना कतरिनाने भावनेच्या भरात सगळे चॉकलेट्स खावून मोठी पंचायत निर्माण केली आहे. 



कतरिनाच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर आज तिचा शाहरूख खानसोबत 'झिरो' हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे. सिनेमात कतरिनाची एन्ट्री बी 'हुस्न परचम' या गाण्यातून झाली आहे. या गाण्याची कोरिओग्राफी बोस्को यांनी केली असून या गाण्याला मराठमोळी जोडी अजय - अतुलने संगीत दिलं आहे.