बंगळुरु : कन्नड सुपरस्टार पुनीत राजकुमार आता या जगात नाही. शुक्रवारी हृदयविकाराच्या झटक्याने त्याचे निधन झाले. पुनीत राजकुमार अवघ्या ४६ वर्षांचा होता. त्याच्या निधनाच्या बातमीने मनोरंजन क्षेत्राला धक्का बसला आहे. बॉलीवूड सेलिब्रिटींपासून ते साऊथ इंडस्ट्रीपर्यंत लोक त्यांच्या निधनाच्या बातमीने शोक व्यक्त करत आहेत. पुनीतच्या मृत्यूची बातमी आल्यानंतर कर्नाटक सरकारने हाय अलर्ट जाहीर केला आहे. पुनीतने 30 हून अधिक कन्नड चित्रपटांमध्ये काम केले होते. गेलं वर्ष मनोरंजन क्षेत्रासाठी कठीण गेले. यंदाही मनोरंजन विश्वातून धक्कादायक बातमी समोर आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुनीत राजकुमारवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहे. अशी माहिती कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.



उपचारादरम्यान मृत्यू


शुक्रवारी सकाळी पुनीत राजकुमारने छातीत दुखत असल्याची तक्रार केली. त्यानंतर लगेचच त्याला बंगळुरू येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. पुनीत राजकुमारला हृदयविकाराचा झटका आल्याचे रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.


कर्नाटक सरकारने हाय अलर्ट जारी केला आहे
पुनीतला चाहत्यांमध्ये अप्पू आणि पॉवर हाऊस म्हणून प्रसिद्ध होता. सोशल मीडियावर पुनीत राजकुमारच्या निधनावर लोक सतत काहीतरी लिहित आहेत. अभिनेत्याच्या मृत्यूनंतर काही वेळातच कर्नाटक सरकारने राज्यात हाय अलर्ट जाहीर केला आहे. यासोबतच सर्व चित्रपटगृहे तातडीने बंद करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. त्याचे चाहते रस्त्यावर येऊ नयेत म्हणून हे करण्यात आले.


एरिका फर्नांडिसला धक्काच बसला


पुनीत राजकुमार यांच्या निधनाच्या बातमीने सर्वांनाच हादरवून सोडले आहे. टीव्ही अभिनेत्री एरिका फर्नांडिसने ट्विट करून पुनीत राजकुमार यांना श्रद्धांजली वाहिली आहे. एरिका फर्नांडिसने ट्विटरवर लिहिले की, 'मी सध्या शॉकमध्ये आहे. या बातमीवर विश्वास ठेवणे कठीण आहे. जो आपल्या तब्येतीबद्दल खूप जागरूक असायचा… पुनीत लवकरच निघून गेला…. अप्पू तुमच्या आत्म्याला शांती लाभो.