मुंबई : गोरेगाव परिसरात पोलिसांनी एक सेक्स रॅकेट उघड केलं आहे. यामध्ये बॉलीवूडच्या दोन अभिनेत्रींचा समावेश असल्याचं उघड झालं आहे. बॉलीवूडच्या अभिनेत्री सेक्स रॅकेटमध्ये असल्याचं कळताच बॉलीवूड विश्वात खळबळ उडाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गोरेगावच्या वेस्टर्न एक्सप्रेस हायवेजवळच्या 'द वेस्टिन' या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये छापा टाकला आहे. पोलिसांमधल्याच एका कर्मचाऱ्यानं ग्राहक बनून सेक्स रॅकेटमध्ये सामील असलेल्या तरुणीशी संपर्क केला. त्यानंतर सेक्स रॅकेटमध्ये पैसे स्वीकारतानाच पोलिसांनी तरुणीला अटक केली आहे. नंतर ही तरुणी बॉलीवूडमंध्ये अभिनेत्री असल्याचं उघड झालं.


अभिनेत्रीला माझगाव कोर्टात नेण्यात आलं आहे. तिच्यावर गुन्हा दाखल करून पोलीस पुढील तपास करत आहेत. आपल्याला एक्स बॉयफ्रेंडने या सगळ्या प्रकारात अडकवल्याचा आरोप केला आहे. आपल्यावर राग काढत असल्याचं म्हणत तिने यासाठी एक्स बॉयफ्रेंडला जबाबदार धरलं आहे. 


बॉलिवूड अभिनेत्रीवर कलम 370 (3) आणि 34 इंडियन पिनल कोड आणि कलम 4,5, इमॉरल ट्रॅफिकिंग सारखे कलम लावण्यात आले आहे. पोलिस उपायुक्त डी एस स्वामी यांच्या टीमने ही कारवाई गुरूवारी रात्री ही कारवाई केली. यामध्ये पोलिसांच्या टीमने केलेल्या कारवाईचं कौतुक होत आहे. 


या सगळ्याप्रकरणाने बॉलिवूडमध्ये एक खळबळ उडाली आहे. बॉलिवूड आणि सेक्स रॅकेट याचा पूर्वीपासूनचा संबंध आहे. या घटनेनी ती गोष्ट पुन्हा एकदा समोर आली.