२२ वर्षांच्या संसारानंतर हिमेश-कोमलचा घटस्फोट
बॉलिवूडमधून अफेअर्स आणि घटस्फोटाच्या बातम्या येतच राहतात... पण, आता मात्र तब्बल २२ वर्ष एकमेकांची साथ दिल्यानंतर एक जोडपं विभक्त होतंय.
मुंबई : बॉलिवूडमधून अफेअर्स आणि घटस्फोटाच्या बातम्या येतच राहतात... पण, आता मात्र तब्बल २२ वर्ष एकमेकांची साथ दिल्यानंतर एक जोडपं विभक्त होतंय.
अरबाज खान - मलाईका, फरहान अख्तर - अधुना यांच्यानंतर आता गायक-संगीतकार हिमेश रेशमिया आणि पत्नी कोमल या दोघांचेही मार्ग वेगवेगळे झालेत.
मुंबईच्या वांद्रे कोर्टात या दोघांच्या घटस्फोटावर शिक्कामोर्तब झालंय. 'आम्ही सहसंमतीनं हा घटस्फोट घेतलाय... आम्ही दोघंही एकमेकांच्या निर्णयाचा मान राखतो...' असं हिमेशनं घटस्फोटानंतर म्हटलंय. कोमलनंही आम्ही दोघं चांगल्या पद्धतीनं एकमेकांपासून विलग होतोय... आमच्यात कुठलाही कडवटपणा नाही, असं म्हटलंय.
हिमेशनं २०१६ मध्ये घटस्फोटासाठी अर्ज केला होता. हिमेश-कोमलला एक मुलगा आहे. दोघंही त्याच्यावर लक्ष ठेवतील.
हिमेशची एका अभिनेत्रीशी जवळीक या घटस्फोटामागचं कारण असल्याची चर्चा बॉलिवूड वर्तुळात रंगतेय.