BadasS Ravi Kumar : बॉलिवूड इंडस्ट्रीला हिमेश रेशमियाने अनेक हिट गाणी दिली आहेत. हिमेश रेशमियाच्या गाण्यांना आणि त्याच्या संगीताला चाहत्यांच्या हृदयामध्ये विशेष स्थान आहे. सध्य हिमेश रेशमिया त्याच्या आगामी 'बैडएस रवि कुमार' या चित्रपटामुळे सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये हिमेश रेशमिया पहिल्यांदाच धमाकेदार ॲक्शन करताना दिसत आहे. 'बैडएस रवि कुमार'चा ट्रेलर पाहिल्यानंतर हिमेश रेशमियाला त्याच्या फिल्मी कारकिर्दीतील पहिला हिट चित्रपट मिळू शकेल अशी अपेक्षा आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हिमेश रेशमियाची संगीत क्षेत्रातील कारकीर्द खूप यशस्वी आहे, मात्र, अभिनेत्याला पहिल्यापासूनच अभिनयाची आवड आहे. आपली ही आवड पूर्ण करण्यासाठी हिमेश रेशमियाने अनेक चित्रपटांमध्ये काम देखील केलं आहे. मात्र, आजपर्यंत त्याचा एकही हिट चित्रपट आलेला नाही. 'बैडएस रवि कुमार'च्या ट्रेलरमध्ये हिमेशचा खतरनाक लूक पाहायला मिळत आहे. त्याचा हा लूक चाहत्यांना आश्चर्यचकित करणारा आहे. चित्रपटाचा ट्रेलर रिलीज होताच नंबर 1 वर ट्रेंड करू लागला आहे. 


हिमेश रेशमियाचा करिअर आलेख 


हिमेश रेशमियाने आपल्या अभिनय कारकिर्दीला 2007 मध्ये सुरुवात केली होती. त्याचा पहिला चित्रपट 'आप का सुरूर' 29 जून रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बजेटपेक्षा जास्त कमाई केली होती. यानंतर हिमेश रेशमियाने एकही हिट चित्रपट दिला नाही. 2008 ते 2020 पर्यंत अभिनेत्याने 7 चित्रपट प्रदर्शित केले. ज्यामध्ये कर्ज़्ज़, रेडिओ, कजरारे, दमदम, द एक्सपोज, हॅपी हार्डी आणि हीर या चित्रपटांचा समावेश आहे. हे सातही चित्रपट प्रदर्शित होताच बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरले. 


अशातच आता हिमेशचा 'बैडएस रवि कुमार' चित्रपट फेब्रुवारीमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करतो शकतो असा अंदाज वर्तवला जात आहे. 



रिलीजपूर्वीच 20 कोटींची कमाई


'बैडएस रवि कुमार' या चित्रपटाने रिलीजपूर्वीच 20 कोटींची कमाई केली आहे. हिमेश रेशमियाच्या या चित्रपटाने त्याच्या संगीत हक्कांच्या माध्यमातून ही कमाई केली आहे. अक्षय कुमारच्या 'स्कायफोर्स' आणि हिमेश रेशमियाच्या 'बैडएस रवि कुमार'चा ट्रेलर एकाच दिवशी लॉन्च झाला होता. पण प्रेक्षकांकडून हिमेश रेशमियाच्या चित्रपटाच्या ट्रेलरला पंसती मिळत आहे.