मुंबई : बिग बॉसची फायनालिस्ट आणि पहिली रनर अप हिना खानचे सोशल मीडियावर मोठा फॅन फॉलोइंग आहे. तिने बराच काळा छोट्या पडद्यावरुन प्रेक्षकांचे मनोरंजन केले. त्यानंतर ती आता पुन्हा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झालीये. यावेळी तिचा लूक पहिल्यापेक्षा पूर्णपणे वेगळा आहे. हिना खानने नुकताच एक फोटो शेअर केलाय. यात तिचा देसी अवतार पाहायला मिळतोय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हिना खान बिग बॉसमध्ये असताना तिची स्टाईल आणि लुक्समुळे नेहमीच चर्चेत असायची. शोमध्ये तिला फॅशन दिवा असे नाव देण्यात आले होते. यानंतर ती अनेकदा शोमघ्ये रँप वॉक करताना दिसली होती. मात्र आपल्या नव्या प्रोजेक्टमध्ये ती पूर्णणे वेगळी दिसते. रिपोर्ट्सनुसार नव्या प्रोजेक्टचे नाव स्मार्टफोन आहे. 


हिनाने हा नवा फोटो शेअर करताना म्हटलेय. मला स्वत:ला आव्हाने घ्यायला आवडते. विविध पात्रे साकारल्याने माझ्या क्षमतांमध्ये सुधारणा होतेय. मला आशा आहे की तुम्हाला माझा हा लूक आवडला असेल.



हिनाने सलग आठ वर्षे ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेत अक्षराची भूमिका साकारली होती. यानंतर तिने कलर्स शो फिअर फॅक्टर आणि बिग बॉससारख्या रिअॅलिटी शोमध्येही काम केले.