मुंबई : प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री हिना खानबद्दल सध्या मोठी बातमी समोर येत आहे, ज्या बातमीमुळे तिच्या चाहत्यांना धक्का बसू शकतो. दिला आहे. खरं तर, अभिनेत्रीची काही दिवसांपासून तब्येत ठीक नव्हती. अशा परिस्थितीत हिनाला आता रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आता हॉस्पिटलमधील स्वतःचा एक फोटो शेअर करून अभिनेत्रीने तिच्या चाहत्यांना तिच्या आरोग्याविषयी अपडेटही दिलं आहे. सोशल मीडियावर हिना खानचा खूप मोठा चाहता वर्ग आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हिना खानने शेअर केला हॉस्पिटलमधील फोटो 
'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेत्री हिना खानने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये अभिनेत्री हॉस्पिटलच्या ड्रेसमध्ये मिरर सेल्फी क्लिक करताना दिसत आहे. फोटोमध्ये तिचा चेहरा पूर्णपणे उतरलेला दिसत आहे, तिने केस बांधले आहेत. त्याचवेळी तिच्या डाव्या हाताला सलाईन टेप दिसत आहे. मात्र, या स्थितीतही हिना पाऊटसोबत सेल्फी काढताना दिसत आहे.


काय झालंय अभिनेत्रीला?
हा फोटो शेअर करताना हिनाने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'प्रेम आणि आनंद पसरवा.' तिने पुढे लिहिलं की, 'तुम्ही कुठे आहात कोणत्या स्थितीत आहात, जर तुम्हाला आरसा सापडला तर आरशात सेल्फी घेण्यास विसरू नका...' मात्र, हिनाने शेवटपर्यंत याचा खुलासा केलेला नाही की, तिला नक्की काय झालं आहे.  कोणत्या प्रॉब्लेमुळे अभिनेत्रीला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे, मात्र तिला या अवस्थेत पाहून चाहते खूपच नाराज झाले आहेत.



या चित्रपटात हिना खान दिसणार आहे
हिना खानच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, ती तिच्या 'कंट्री ऑफ ब्लाइंड' या हिंदी-इंग्रजी चित्रपटामुळे खूप दिवसांपासून चर्चेत आहे. मात्र, अभिनेत्री गेल्या काही काळापासून कमी प्रोजेक्ट्स साइन करत आहे. अभिनेत्री हिना खान कायम स्वतःचे बोल्ड आणि हॉट फोटो सोशल मीडियावर शेअर  करत असते. सोशल मीडियावर पोस्ट करताच अभिनेत्रींच्या फोटोंवर चाहते कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव करतात.