मुंबई : छोट्या पडद्यावरील अभिनेत्री हिना खान (Hina Khan) ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. हिना ही तिच्या अभिनयासोबतच सुंदरतेसाठी ओळखली जाते. हिना सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. हिनाचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना आपण पाहतो. हिना फक्त वेस्टर्न नाही तर इंडियन कपड्यांमध्येही सुंदर दिसते. यावेळी हिनानं साडी नेसली होती पण तिला ती साडी सांभाळता आली नाही. या दरम्यानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हेही वाचा : आलिशान घर आणि गाड्या, प्रभासच्या एकूण संपत्तीची किंमती ऐकून तुम्हालाही बसेल धक्का


नुकतीच एकता कपूरनं तिच्या घरी दिवाळी पार्टीचे आयोजन केले होते. या दरम्यान, अनेक बॉलिवूड आणि टेलिव्हिजन कलाकार या दिवाळी पार्टीत पोहोचले होते. या पार्टीतला हिनाचा लूक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. हिना सुंदर पारंपारिक लूकमध्ये दिसत आहे. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


फोटो काढण्यासाठी हिना पापाराझींना पोज देत होती. त्यानंतर हिना एकताच्या घराकडे जाण्यासाठी निघाली तेव्हा तिचा साडीत पा अडकला आणि हिना घसरली पण तिनं कसा बसा तिचा तोल सांभाळला. (hina khan slips on saree at ekta kapoor s diwali party video viral )


स्टार प्लसच्या प्रसिद्ध टीव्ही शो 'ये रिश्ता क्या कहलाता है' मध्ये सुसंस्कृत अक्षराची भूमिका साकारून हिनानं लोकप्रियचा मिळवली होती. या मालिकेतील तिची भूमिका प्रेक्षकांना इतकी आवडली होती की लोक तिला घरात अक्षराच्या नावानेच ओळखतात. यानंतर हिनानं 'बिग बॉस', 'खतरों के खिलाडी'मधून कान्सच्या रेड कार्पेटवर तिचे सौंदर्य वाढवले. हिना सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि दररोज तिचे नवीन फोटो आणि व्हिडिओ तिच्या चाहत्यांसोबत शेअर करत असते.