आलिशान घर आणि गाड्या, प्रभासच्या एकूण संपत्तीची किंमती ऐकून तुम्हालाही बसेल धक्का

आज प्रभासचा 43 वा वाढदिवस आहे. 

Updated: Oct 23, 2022, 01:26 PM IST
आलिशान घर आणि गाड्या, प्रभासच्या एकूण संपत्तीची किंमती ऐकून तुम्हालाही बसेल धक्का title=

मुंबई : दाक्षिणात्य अभिनेता प्रभास (Prabhas) हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. प्रभासला त्याच्या 'बाहुबली' चित्रपटामुळे खरी ओळख मिळाली. या चित्रपटाला मिळालेल्या अफाट यशानं, प्रभास संपूर्ण भारताचा स्टार बनला. आज त्याच्या चाहते फक्त भारतात नाही तर परदेशात आहेत. हा टॉलिवूड चित्रपटसृष्टीतील सर्वात जास्त मानधन घेणारा आणि महागडा अभिनेता आहे.

हेही वाचा : Abhishek Bachchan बेरोजगार? नेटकरी आणि अभिषेकमध्ये जुंपली

एका चित्रपटासाठी प्रभास 15 ते 40 कोटी रुपये मानधन म्हणून घेतो. एवढंच नाही तर त्याच्या आगामी 'आदिपुरुष' या चित्रपटानं सर्व रेकॉर्ड मोडले. या चित्रपटासाठी त्यानं निर्मात्यांकडून 100 कोटी फी घेतली असल्याचे म्हटले आहे. आज प्रभासच्या 43व्या वाढदिवसानिमित्त त्याच्या संपत्ती विषयी जाणून घेऊया...

'बाहुबली'च्या यशानंतर प्रभासनं त्याची फी वाढवली होती. प्रभासच्या कमाईचे माध्यम म्हणजे त्याचे चित्रपट आणि ब्रँड एंडोर्समेंट्स आहे. आजच्या काळात प्रभासच्या एकूण संपत्तीबद्दल बोलायचं झालं तर तो 215 कोटी रुपयांच्या मालमत्तेचा मालक आहे. प्रभासनं आपल्या अभिनय क्षेत्रातील त्याच्या करिअरला तेलगू चित्रपटातून सुरुवात केली आणि आज तो आंतरराष्ट्रीय स्तरावरील अभिनेता बनला आहे. (baahubali actror prabhas net worth monthly income and movies fees car collection net worth) 

हेही वाचा : मराठी सिनेमा बॉलिवूडवर पडणार भारी, 'राम सेतू' आणि 'थॅंक गॉड' साठी ठरू शकतो धोका!

2015 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'बाहुबली: द बिगिनिंग'नं प्रभासचे नशीब पूर्णपणे चमकले आणि या चित्रपटाच्या दुसऱ्या भागानंही यशाचे शिखर गाठले आहे. या चित्रपटासाठी अभिनेत्याने 40 कोटी रुपये मानधन घेतले होते. प्रभासचा जन्म आंध्र प्रदेशातील एका क्षत्रिय कुटुंबात झाला. प्रभासचं पूर्ण नाव सूर्यनारायण व्यंकट प्रभास राजू उप्पलपटी आहे.

प्रभासचं घर हैदराबादच्या प्राइम लोकेशनवर आहे. सर्व प्रकारच्या सुविधांनी सुसज्ज, या घरामध्ये तुम्हाला आवश्यक असलेली प्रत्येक लक्झरी मिळेल. मीडिया रिपोर्ट्सनुसार, प्रभास 2014 मध्ये या घरात शिफ्ट झाला होता. या घराची किंमत 65 कोटी असल्याचे सांगण्यात येत आहे.

हेही वाचा : शॉर्ट्स घालून मंदिरात जाणं एकता कपूरला पडलं महागात, झाली ट्रोलिंगची शिकार

प्रभासला लग्झरीयस गाड्या आवडतात आहे. त्याच्या कार कलेक्शनमध्ये Skoda Superb, BMW X3, Jaguar XJR, Range Rover आणि Rolly Roy Phantom या जगातील सर्वात महागड्या गाड्यांचा समावेश आहे. यातील अनेक गाड्यांची किंमत कोटींची आहे. फक्त रोल्स रॉयसची किंमत 8 कोटींहून अधिक आहे.