Swara Bhaskar ची मुलगी हिंदू होणार की मुस्लिम? अभिनेत्रीच्या उत्तरानं ट्रोलर्स अवाक
स्वरा भास्करची गणना बॉलिवूडमधील सगळ्यात स्पष्टवक्ती अभिनेत्रींमध्ये केली जाते. ती अनेकदा कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. तिने याच वर्षी १२ फेब्रुवारीला फहाद अहमदसोबत लग्न करून सर्वांना आश्चर्यचकित केलं. यानंतर तिने तिच्या प्रेग्नंसीची बातमी देवून सगळ्यांना आश्चर्यचकित केलं.
मुंबई : स्वरा भास्करची गणना बॉलिवूडमधील सगळ्यात स्पष्टवक्ती अभिनेत्रींमध्ये केली जाते. ती अनेकदा कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. तिने याच वर्षी १२ फेब्रुवारीला फहाद अहमदसोबत लग्न करून सर्वांना आश्चर्यचकित केलं. यानंतर तिने तिच्या प्रेग्नंसीची बातमी देवून सगळ्यांना आश्चर्यचकित केलं. तिने स्वत: सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून सर्वांना तिच्या प्रेग्नेंसीबद्दल सांगितलं. यानंतर तिने 23 सप्टेंबर रोजी मुलगी राबियाला जन्म दिला.
आता आई झाल्यानंतर स्वरा खूप खुश आहे. ती तिच्या नवजात मुलीसह खूप आनंदी आहे. आई झाल्यानंतर स्वराने म्हटलंय की, तिचं आयुष्य पूर्णपणे बदललं आहे. जरिही तिला काही समस्या येत असल्या तरी या परिस्थितीचा ती खूप आनंद घेत आहे.
स्वरा धर्माने हिंदू आहे तर तिचा नवरा राजकारणी फहाद अहमद याचा धर्म मुस्लिम आहे. या जोडप्याच्या आंतरजातीय विवाहाने या कारणास्तव बरीच चर्चा केली. आता त्यांच्या आयुष्यात एक सुंदर मुलगी आली आहे. हे जोडपं आपल्या मुलीला कोणते संस्कार देणार हे जाणून घेण्यासाठी त्यांचे चाहते नेहमीच उत्सुक असतात. या प्रश्नांची उत्तरे प्रथमच स्वराने दिली आहेत.
हिंदुस्तान टाईम्सशी बोलताना स्वराने आई झाल्याचा आनंद शेअर केला. स्वतःला खूप नशीबवान म्हणवून ती म्हणाली की, तिच्या आयुष्यात एक सुंदर मुलगी आली जिच्यामुळे ती खूपच आनंदी आहे. पुढे, जेव्हा अभिनेत्रीला विचारलं गेलं की, ती आपल्या मुलीला कोणते संस्कार देईल? तर या प्रश्नावर तिने चोख उत्तर देऊन चाहत्यांची मने जिंकली आहेत.
जाणून घ्या राबियाची सर्वात खास गोष्ट काय आहे
रिपोर्टनुसार, स्वरा म्हणाली, प्रत्येक मूल तिच्या आई-वडिलांची सावली असते. तिच्या पालकांनी दिलेले संस्कार घेऊन ते मोठे होतात. राबियाकडे दोन्ही जग (हिंदू-मुस्लिम) आहेत. जे तिच्यासाठी सर्वोत्तम गोष्ट आहे. तिला दोन्ही प्रकारच्या धर्मांवर विश्वास ठेवायची संधी मिळेल.
जसा भारत जात आणि धर्म यांचं मिश्रण आहे. कसं त्यांनी राबियाच्या छठीच्या दिवशी ही छठी दोन्ही धर्मात साजरी केली जाते. हे हिंदू आणि मुस्लिम दोघांसाठी समान आहे. हे मला वाटतं की, ते सुंदर आहे. दोघांमध्ये बरंच साम्य असलं तरीही आम्ही फरकांवर लक्ष केंद्रित करतो. जेव्हा तुम्ही अजेंड्यावर आधारित मतभेद शोधता तेव्हा तुम्हाला मूर्खपणाशिवाय काहीही मिळणार नाही.