मुंबई :  KGF Chapter 2 सिनेमाची सध्या सर्वत्र हवा आहे. या चित्रपटानंतर आता प्रेक्षक या सिनेमाच्या तिसऱ्या भागाची आतुरतेने वाट पाहत आहेत. चित्रपट प्रदर्शित होऊन १७ दिवस झाले असून आजही चित्रपटगृहं हाऊसफुल्ल आहेत. या चित्रपटाने भारतात सुमारे 700 कोटींचा व्यवसाय केला आहे. केवळ मुलींनाच नाही तर आता प्रत्येक मुलालाही रॉकी म्हणजेच ​​यशचं वेड लागलं आहे. आता त्याची मुलगीही त्याच्या चाहत्यांच्या यादीत सामील झाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

KGF स्टार रॉकी म्हणजे यशचं सर्वांनाच वेड लागले आहे. रॉकीच्या अॅक्शन स्टाइलने आणि डायलॉग्सने खळबळ उडवून दिली आहे. सोशल मीडिया असो की, इंस्टाग्राम रील, रॉकीची सर्वत्र हवा आहे. त्याचबरोबर त्यांची मुलगी आयराही त्याची फॅन झाली आहे. अलीकडेच आयराने रॉकीच्या एका सीनचे डायलॉग्स बोलले आहेत. ती 'आर आर आर रॉकी' म्हणताना दिसत आहे. त्याचबरोबर त्याची ही स्टाइल पाहून स्वत: रॉकी म्हणजेच यशही त्याचा चाहता झाला आहे.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


KGF आणि KGF 2 च्या अभूतपूर्व यशानंतर आता चाहते KGF च्या तिसऱ्या पार्टची वाट पाहत आहेत. ट्विटर असो वा इन्स्टाग्राम, चाहत्यांमध्ये यश ते चॅप्टर 3 बद्दल उत्साह दिसून येत आहे. चॅप्टर 2 मध्ये दाखवण्यात आलेला सस्पेन्स प्रेक्षकांना चॅप्टर 3 बद्दल उत्सुक बनवत आहे. यश व्यतिरिक्त या सिनेमात संजय दत्त आणि रवीना टंडन देखील आहेत.