Al Pacino Girlfriend Gets Pregnant: प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेते अल्फ्रेडो जेम्स उर्फ अल पचीनो (Alfredo James Pacino) हे नाव सध्या चर्चेत आहे. याचं कारण अल पचीनो वयाच्या 83 व्या वर्षी बाप होणार आहे. त्यांची 29 वर्षीय प्रेयसी नूर अलफल्लाह (Noor Alfallah) गर्भवती असून ही बातमी समोर आल्यानंतर हॉलिवूडमध्ये खळबळ माजली आहे. विशेष म्हणजे, अल पचीनो चौथ्यांदा बाप होणार आहे. अल पचीनो बाप होणार या बातमीने फक्त त्यांचे चाहतेच नाही तर त्यांनाही धक्का बसला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अल पचीनो यांना आपली प्रेयसी गर्भवती असल्याच्या बातमीने इतका धक्का बसला आहे की त्यांनी तिची DNA चाचणी करण्याची मागणी केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

83 वर्षीय अल पचीनो आणि 29 नूर अलफल्लाह 2022 पासून एकत्र आहेत. काही दिवसांपूर्वीच नूर अलफल्लाह अल पचीने यांच्यापासून गर्भवती असल्याचं वृत्त समोर आलं होतं. तेव्हापासून दोघांच्या नावाची जोरदार चर्चा रंगली आहे. अल पचीनो यांच्या मॅनेजरनेही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. मात्र अल पचीनो यांना स्वत:चा यावर विश्वासच बसत नाही आहे. या अनपेक्षित बातमीमुळे त्यांची डीएनए चाचणी करण्याची इच्छा आहे. याचं कारण अल पचीनो यांना वैद्यकीय कारणामुळे हे शक्य नसल्याचं वाटत आहे. 


काही रिपोर्टनुसार, यानंतर नूरने डीएनए चाचणी केली असून यामध्ये अल पचीनो हेच मुलाचे बाप असल्याचं सिद्ध झालं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नूर अलफल्लाह आठ महिन्यांची गर्भवती आहे. अल पचीनो आणि नूर आता महिन्याभरात नवीन बाळाचं स्वागत करण्यासाठी सज्ज असल्याचं त्यांच्या प्रतिनिधीकडून सांगण्यात आलं आहे. दरम्यान, अल पचीनो यांना 11 आठवडे नूर गर्भवती असल्याची माहिती नव्हती अशी माहिती मिळत आहे. 


अल पचीनो चौथ्या बाळाची योजना आखत होते. पण दोघांच्या नात्याला अद्याप वर्षही पूर्ण झालेलं नसताना फार लवकर बाळाचं आगमन होत आहे. 2022 एप्रिलमध्ये सर्वात प्रथम अल पचीनो आणि नूर एकमेकांना डेट करत असल्याचं वृत्त समोर आलं होतं. यानंतर ते दोघे डिनरला एकत्र गेल्याचं कॅमेऱ्यात कैद झालं होतं. करोनाच्या सुरुवातीपासून दोघे एकमेकांना डेटिंग करत असल्याची माहिती आहे. 


अल पचीनो यांना आपली पूर्वाश्रमीची प्रेयसी Jan Tarrant हिच्यापासून एक मुलगी आहे. तसंच Beverly D’ Angelo हिच्यापासून दोन जुळी मुलं आहे. अँटन आणि ओलिविया अशी यांची नावं आहेत. अल पचीनो यांनी 2008 ते 2018 दरम्यान Lucila Polak हिला डेट केलं. पण तिच्यापासून त्यांना एकही मूल नाही आहे. 


नूर अलफल्लाह एक चित्रपट निर्माता असल्याचं बोललं जात आहे. रोलिंग स्टोन्सचा गायक मिक जेगर याच्याशीही याआधी तिचं नाव जोडलं गेलं होतं. तसंच 2019 मध्ये ए-लिस्टर हॉलिवूड स्टार क्लिंट ईस्टवुड (93) सोबत देखील ती दिसली होती. परंतु ते फक्त कौटुंबिक मित्र असल्याचं सांगण्यात आलं होतं. 


अल पचीनो हा त्याच्या काळातील सर्वात प्रसिद्ध आणि प्रशंसित अभिनेत्यांपैकी एक आहे. द गॉडफादर, स्कारफेस, हीट, द डेव्हिल्स अॅडव्होकेट, इन्सोम्निया, द आयरिशमॅन आणि सेन्ट ऑफ अ वुमन यांसारख्या क्लासिक चित्रपटातील आल्या अभिनयासाठी ते प्रसिद्ध आहेत. 1992 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा ऑस्कर पुरस्काने त्यांना गौरवण्यात आलं होतं. .