Actor Dancer passes away : आतापर्यंत अनेक सेलिब्रिटींनी आत्महत्या करत जगाचा अखेरचा निरोप घेतला आणि चाहत्यांना मोठा धक्का देवून गेले. आता देखील एका प्रसिद्ध सिलेब्रिटीने आत्महत्या केली आहे. हॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता, डान्सर, डीजे स्टीफन बॉसने (stephen boss ) आत्महत्या केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार अभिनेत्याने 13 डिसेंबर 2022 रोजी जगाचा अखेरचा निरोप घेतला. स्टीफनचा मृतदेह हॉटेलमध्ये आढळला. स्टीफन बॉस ‘द एलिन डी जॉनर्स’, आणि ‘सो यू थिंक यू कॅन डान्स’ (so you think you can dance) यांसारख्या शोमुळे देखील चर्चेत होता.  एवढंच नाही, तर डान्समुळे देखील तो डान्सप्रेमींमध्ये प्रसिद्ध होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मिडीया रिपोर्टनुसार, स्टीफन बॉसचा मृतदेह एका हॉटेलमध्ये आढळला. स्टीफनच्या पत्नीने सांगितलं की, तो स्वतःची गाडी न घेता घराबाहेर निघाला होता. ही एक विचित्र घटना होती. कारण स्टीफन कधीही त्याच्या गाडी शिवाय बाहेर गेला नाही. स्टीफनच्या अचानक निधनामुळे कुटुंब आणि चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. (stephen boss family )


स्टीफनने स्वतःला गोळी मारुन स्वतःचं जीवन संपवलं असं सांगण्यात येत आहे. पण अभिनेत्याने एवढं टोकाचं पाऊल का उचलंलं? हे कारण अद्याप समोर येवू शकलेलं नाही. अभिनेत्याच्या निधनानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहते स्टीफनला श्रद्धांजली वाहत आहेत. (stephen boss social media)



स्टीफन बॉसच्या मृत्यूनंतर त्यांची पत्नी एलेन हॉकर म्हणते, 'मला जड अंतःकरणानं सांगावं लागत आहे की माझा पती स्टीफन आम्हा सर्वांना सोडून गेला. स्टीफन कायम कुटुंबाला, मित्रांना आणि समाजाला प्रचंड महत्त्व देत होता. प्रेम त्याच्यासाठी सर्वस्व होतं. आमच्या कुटुंबाचा तो कणा होता. (stephen boss wife)


'तो फक्त एक चांगला पती नाही, तर एक चांगला पती देखील होता. अनेक चाहत्यांसाठी तो प्रेरणास्थान होता. त्याच्या जाण्यानंतर त्याचा सकारात्मक स्वभाव मला कायम जाणवत राहिल...' असं देखील स्टीफनची पत्नी म्हणाली. (stephen boss fan)