मुंबई : एखादं नातं ज्यावेळी आकारास येतं आणि ते ठराविक काळानंतर लग्नाच्या टप्प्यावर जातं तेव्हा सर्वांचाच आनंद ओथंबून वाहताना दिसतो. हेच नातं जेव्हा तुटण्याच्या वळणावर येतं तेव्हा मात्र या आनंदाचं रुपांतच चर्चा आणि उगाचच्या कुतूहलामध्ये होताना दिसतं. (johnny depp amber heard defamation case)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या अशाच एका सेलिब्रिटी जोडीच्या नात्यावर संपूर्ण जग आणि जगभरातील कलाविश्वांची नजर आहे. कारण ठरत आहे ते म्हणजे या नात्यात एकमेकांवर केले जाणारे आरोप- प्रत्यारोप. 


हॉलिवूड गाजवणारी ही जोडी आहे, जॉनी डेप (Johnny Depp) आणि एंबर हर्ड (Amber Heard) यांची. अब्रूनुकसानी प्रकरणात काही काळासाठी तहकूब असणाऱ्या या प्रकरणाच्या सुनावणीला पुन्हा सुरुवात झाली. ज्यामध्ये एंबरनं तिचं मत मांडलं. 


जॉनीकडून आपल्याला जबर मारहाण करण्यात आल्याचा गंभीर आरोप तिनं केला. न्यायालयासमोर काही फोटोही तिनं शेअर केले. या फोटोंमध्ये तिच्या चेहऱ्यावर काहीशी सूज आणि लाल रंगाचा व्रण दिसत आहे. 


आपण हे व्रण मेकअपनं लपवल्याचंही ती म्हणाली. 1 आठवड्याच्या प्रतीक्षेनंतर पुन्हा सुरु झालेल्या सुनावणीदरम्यान, एंबरनं कौटुंबीक हिंसेवर वक्तव्य केलं. व्हर्जिनियाच्या न्यायालयापुढे जॉनीनं आपल्याला फोन फेकून मारल्याचं सांगितलं. 


2016 मे महिन्यातील या घटनेनंतरच एंबर आणि जॉनीनं घटस्फोटासाठी न्यायालयात धाव घेतली होती. तिथं जॉनीवर एंबर अमानवी शरीरसंबंध, मारहाण असे गंभीर आरोप करत असतानाच तिथे त्याच्या वतीनं साक्ष देण्यासाठी आलेल्या मंडळींनी मात्र वेगळंच चित्र जगासमोर ठेवलं आहे. 


एंबरचा राग अनावर होताच ती जॉनीला मारहाण करते असंही जॉनीच्या वतीनं साक्ष देणाऱ्यांनी सांगितलं होतं. एंबर करत असलेले सर्व आरोप जॉनीच्या वतीनं देण्यात येणाऱ्या साक्ष आणि पुराव्यांपुढे फिके पड़त आहेत परिणामी या प्रकरणाला नवं वळण मिळताना दिसत आहे. 



नेमकं प्रकरण काय? 
जॉनी डेप यानं 50 मिलियन डॉलरचा अब्रुनुकसानीचा दावा एंबरवर ठोकला. 2018 मध्ये एंबरनं एका वर्तमानपत्रात एक लेख लिहिला जिथं तिनं नाव न घेता जॉनीवर कौटुंबीक हिंसेचा आरोप केला होता. 


वर्षभराचं लग्न आणि इतका मोठा वाद... 
जॉनी आणि एंबरची पहिली ओळख 'द रम डायरी' च्या सेटवर झाली होती. यानंतर त्यांच्या रिलेशनशिपची सुरुवात केली. 2015 मध्ये या दोघांनी लग्न करत प्रेमाच्या नात्याला नवं नाव दिलं. पण, हे लग्न फार काळ टिकू शकलं नाही. 2016 मध्येच ही जोडी वेगळी झाली आणि 2017 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला आणि या प्रकरणाचा आणखी भडका उडाला.