Tom Cruise : आपल्याकडे एखादी आवडती वस्तू असते आणि ती अचानक गायब होते तेव्हा आपल्याला वाईट वाटणं साहजिकच पण जर का आपल्याकडे एखादी BMW car   असेल आणि ती अचानक कुठे गायब झाली तर हो.. बरोबर असाच एक प्रकार घडलाय एका सुप्रसिद्ध अभिनेत्यासोबत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आजकाल सेलिब्रेटींमध्ये महागड्या कार्सची फॅशन आहे. सगळ्यांकडेच एकसोएक महागड्या गाड्यांचे कलेक्शनही आहे. तसंच कलेक्शन या अभिनेत्याकडेही आहे आणि त्याच नाव आहे टॉम क्रुझची. 


हॉलिवूड स्टार टॉम क्रूझने चित्रपटांमध्ये थरारक स्टंट करून अनेकांचं मन जिंकलं आहे. पण लाखो करोडो डॉलर्सचा मालक असलेल्या या अभिनेत्याकडे असणारी BMW ही चोरीला गेली आहे. आणि भयंकर म्हणजे हा प्रकार चक्क त्याच्या चित्रपटाचं शुटिंग चालू असतानाच. 
 
या गाडीमध्ये टॉमच्या काही मौल्यवान वस्तू होत्या त्या चोरीला गेल्या आहेत. बर्मिंगहॅममध्ये 'मिशन इम्पॉसिबल 7' चित्रपटाचे शूटिंग करत असताना हा प्रकार घडला असल्याचे समोर आले होते.  


इलेक्ट्रॉनिक ट्रॅकिंग डिव्हाइससह सुसज्ज असल्यामुळे कार पोलिसांनी जप्त केली आहे. टॉम त्याच्या बॉडीगार्डच्या बीएमडब्ल्यूसह बर्मिंघममध्ये प्रवास करत होता. 1,00,000 पौंड (एक कोटी रुपयांपेक्षा जास्त) वस्तू या कारमध्ये होत्या. टॉम आणि त्याच्या बॉडीगार्डच्या हे लक्षात ही आले नाही की, त्यांची कार चोरांनी पळवून नेली आहे. कार जप्त केली असली तरी त्यातील वस्तू मिळालेल्या नाहीत.


टॉमनं सुरक्षा रक्षकांना सुनावले...
टॉम त्याच्या सुरक्षा टीमवर नाराज झाला आहे. टॉम क्रूझला जेव्हा या चोरीची माहिती मिळाली तेव्हा तो खूप रागावला. त्याने त्याच्या अंगरक्षकालाही फटकारले. ही बातमी समोर आल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला आहे. 


प्रत्येकाच्या मनात तेच प्रश्न उपस्थित होत आहेत की अशा आलिशान हॉटेल समोरून गाडी कशी चोरी झाली आणि कोणाला कळलेच नाही ? जेथे टॉम शूट करतो, तिथे प्रचंड सुरक्षा असते, मग चोरांनी गाडी चोरी केली कशी?


टॉमचा अंगरक्षक, जो अभिनेत्याच्या सुरक्षा कर्मचाऱ्याचाही प्रभारी आहे, त्याला बुधवारी पार्किंगच्या जागेत बीएमडब्ल्यू एक्स 7 नसल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्याने पोलिसांना माहिती दिली. 



वेस्ट मिडलँड पोलीस मुख्यालयापासून 2 मिनिटांच्या अंतरावर ही चोरी झाली. पोलिसांनी सांगितले की, मंगळवारी सकाळी आम्हाला बर्मिंघममधील चर्च स्ट्रीटमधून बीएमडब्ल्यू एक्स 7 चोरी झाल्याची माहिती मिळाली. थोड्या वेळाने स्मेथविक मध्ये कार सापडली. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरांचा शोध सुरू आहे.


जेव्हा टॉमला या घटनेची माहिती मिळाली, तेव्हा त्याच्यासह शूटिंगला उपस्थित असलेले प्रत्येकजण हैराण झाले. या चित्रपटात टॉमसोबत अभिनेत्री Hayley Atwell देखील आहे.