Johnny Depp ने अशा ठिकाणाहून काढला डायमंड नेकलेस की तुम्हाला येईल किळस... Girlfriend सुद्धा झाली हैराण!
1994 मध्ये जॉनी डेपने प्रसिद्ध मॉडेल केट मॉसला डेट केले होते.
Johnny Depp and Kate Moss : हॉलिवूड अभिनेता जॉनी डेप बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. त्याच्यावर केलेल्या अंबर हर्डच्या केसमुळे गेल्या अनेक दिवसांपासून तो चर्चेत होता. परंतु आता त्याच्याशी निगडित अजून एक माहिती समोर येते आहे. याचा खुलासा चक्क त्याच्या पहिल्या एक्स गर्लफ्रेंडनं सांगितला आहे.
जॉनी डेप त्याच्या अफेअर्ससाठीही ओळखला जातो. 1994 मध्ये जॉनी डेपने प्रसिद्ध मॉडेल केट मॉसला डेट केले होते. आता अलीकडेच केट मॉसने एका मुलाखतीत जॉनी डेप आणि त्यांच्या नात्याबद्दल मोकळेपणाने सांगितले. केट मॉसने खुलासा केला की जॉनीने तिला हिऱ्याचे दागिने दिले होते.
जॉनीने त्याच्या बंपमधून हिऱ्याचा नेकलेस काढला तेव्हा...
एका अग्रगण्य ऑनलाइन पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत केट मॉस एका मासिकाचे फोटो पाहताना तिनं एक आठवण शेअर केली. 1995 च्या CFDA फॅशन अवॉर्ड्समधील तिच्या लूकचे फोटो त्या मासिकात होते ते पाहून केट मॉसची नजर तेव्हा तिनं घातलेल्या हिऱ्याच्या नेकलेसवर पडली. या नेकलेसबद्दल माहिती देताना केट मॉस म्हणाली, 'हा डायमंड नेकलेस तिच्या एक्स बॉयफ्रेंड आणि अभिनेता जॉनी डेपने दिला होता.' तो फोटो पाहून केट मॉस म्हणाली, 'हा माझा पहिला नेकलेस होता.
अधिक माहिती देताना केट मॉस म्हणाली, 'आम्ही त्यावेळी जेवायला जात होतो आणि त्यानंतर जॉनीने मला सांगितले की, 'माझ्या बंपमध्ये काहीतरी आहे'. तू पाहशील का मी उत्तर दिले, काय? मी माझा हात त्याच्या पॅन्टमध्ये घातला, त्यात हिऱ्याचा हार बाहेर आला.'
केट मॉसने जॉनी डेपसोबतच्या तिच्या नात्याबद्दलही सांगितले. त्याचा 1994 चा एअरपोर्ट लूकही त्या मासिकात होता. त्यावेळी लॉस एंजेलिस आंतरराष्ट्रीय विमानतळावर केटने फाटलेला पांढर्या रंगाचा टँक टॉप आणि निळ्या रंगाच्या जीन्ससह बिबट्याची प्रिंट अंगावर घेतली होती. .
याबद्दल केट म्हणाली, 'हा फोटो त्यावेळचा आहे जेव्हा मी जॉनीला भेटले होतो. मी जॉनीला भेटायला न्यूयॉर्कहून लॉस एंजेलिसला जात होते. हा तो काळ आहे जेव्हा मी माझं आयुष्य खुप मुक्तपणे जगत होते आणि तेव्हा काहीही करायची मुभा होती.