मुंबई : सेलिब्रिटींसह लूटमार झाल्याच्या घटना फारशा ऐकीवात नाही. पण ज्यावेळी सेलिब्रिटींसह अशी एखादी घटना घडते, त्यावेळी चाहत्यांनसाठीही ती मोठी हैराण करणारी घटना असते. अशीच एक घटना हॉलिवूड अभिनेत्री जेना दीवानसह घडली आहे. लॉस एंजेलिसमध्ये लुटारुंनी जेना दीवानच्या कारची तोडफोड करत तिची ३ हजार डॉलरची बॅग लंपास केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जेनाची yves saint laurent बॅग भारतीय चलनानुसार, जवळपास अडीच लाख रुपयांची होती. काळ्या रंगाच्या कपड्यातील एका महिला ही बॅग चोरताना कॅमेरामध्ये कैद झाली आहे. मात्र याप्रकरणी कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. 




याआधी बॉलिवूड अभिनेत्री मल्लिका शेरावतचीही पॅरिसमध्ये काही चोरट्यांकडून लूट करण्यात आली होती. या घटनेच्या काही दिवसांनंतर टेलिव्हिजन स्टार किमलाही लुटारूंनी बंदुकीचा धाक दाखवून लूटल्याची घटना घटली होती.