पहाटे बोलवून टेबलावर झोपवायचे आणि...; बालपण हिरावलं म्हणत अभिनेत्रीचा आक्रोश
काही घटना इतक्या हादरवणाऱ्या असतात, की त्यांचा बालमनावर झालेला परिणाम काही केल्या पुसता येत नाही. सातत्यानं या - न त्या कारणानं ते प्रसंग डोळ्यांसमोर येतात आणि मनाच काहूर माजतो. असंख्य प्रश्नांचा, भीतीचा आणि संतापाचा....
Child Abuse : बऱ्याचदा बालपणी घडलेल्या घटनांचा आपल्या आयुष्यात प्रभाव पाहायला मिळतो. बालपण (Childhood) म्हणजे आठवणींचा खजिना. पण, या आठवणी प्रत्येक वेळी सकारात्मकच असतील असं नाही. बालपणी घडलेले तकाही प्रसंग, काही घटना इतक्या हादरवणाऱ्या असतात, की त्यांचा बालमनावर झालेला परिणाम काही केल्या पुसता येत नाही. सातत्यानं या - न त्या कारणानं ते प्रसंग डोळ्यांसमोर येतात आणि मनाच काहूर माजतो. असंख्य प्रश्नांचा, भीतीचा आणि संतापाचा....
जागतिक कलाविश्वात प्रसिद्ध असणाऱ्या एका अभिनेत्रीनं अशाच किळसवाण्या कृत्याचा सामना बालपणी केला. कशाचीही समज नव्हती, त्यावेळी तिचं लैंगिक शोषण (Physical Abuse) झालं आणि आजही तो प्रसंग आठवला की तिचा थरकाप उडतो. अशाच थरथरत्या आवाजात तिनं आपल्यासोबत नेमकं काय घडलं होतं, याबाबतचा खुलासा केला.
अधिक वाचा : 19 वर्षाचा हा मुलगा ४-५ वर्षांच्या लहान मुलासारखा का दिसतो...
ही अभिनेत्री आहे पॅरिस हिल्टन (Paris Hilton). अमेरिकेतील युटाहस्थित प्रोवो कॅन्यन स्कूलमध्ये शिक्षण घेत असताना आपल्यावर अत्याचार झाल्याचं तिनं सांगितलं. शाळेतील कर्मचाऱीच तिथल्या विद्यार्थिनींचं शोषण करत होते. सर्वायकल एक्झॅम (Cevical Exam) चा नावानं हे शोषण होत होतं.
माध्यमांना दिलेल्या माहितीत पॅरिस म्हणाली, 'खूप उशिरा... रात्री 3- 4 वाजण्याच्या सुमारास ते मला आणि इतर मुलींना एका खोलीत न्यायचे. तिथे आमची वैद्यकिय तपासणी व्हायची. कुणी डॉक्टर नसूनही ही तपासणी होत होती'. कर्मचाऱ्यांपैकीच काहीजण आम्हाला टेबलावर झोपवून Private Parts ना स्पर्श करायचे हा धक्कादायक प्रकार तिनं थरथरत्या आवाजात उघडकीस आणला.
तेव्हा काहीच कळत नव्हतं, आपल्यासोबत काय घडतंय. इतकी वर्षे हे सर्व मनात दडवून ठेवलं. पण, आज लक्षात येतंय की ते लैंगिक शोषण होतं, असं सांगत पॅरिसनं तिच्या आयुष्यातल्या काळ्या दिवसांवर प्रकाश टाकला.
अधिक वाचा : 'गड्या, घोटाळे सुटायला....'; एकाएकी भरत जाधव असं का म्हणतोय?
पॅरिसनं ट्विटरच्या माध्यमातूनही काही गोष्टी समोर आणल्या. जिथं आपल्याला टेबलावर झोपवून Cervical Exams घेतल्या गेल्या. किंचाळण्याचा प्रयत्न केला तेव्हा तोंड बंद ठेवण्याची तंबी देण्याच आल्याचं सांगितलं. हे सर्व ऐकताना नेटकऱ्यांच्या पायाखालची जमीनही सरकली.
सोळावं वरिस खरोखरंच धोक्याचं...
वयाच्या सोळाव्या वर्षी पॅरिसाला तिच्या आईवडिलांनी बोर्डिंग स्कूलमध्ये पाठवलं होतं. तिथं तिनं 11 महिन्यांचा काळ व्यतीत केला ज्यानंतर ती घरी बरतली. पण, जिथं ती शिक्षणासाठी गेली तिथंच तिच्यासोबत असं काही घडलं जे ती आठवूही इच्छित नाही.