नवी दिल्ली : आपल्या मादक सौंदर्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या हॉलिवूड अभिनेत्री मर्लिन मन्रो हिचा स्टेनलेस स्टीलचा पुतळा चोरीला गेला आहे. हॉलिवूड पब्लिक आर्ट स्पेसपाशी असणाऱ्या फोर लेडीज ऑफ हॉलिवूड गझेबो येथून चोरीस गेल्याची माहिती समोर आली आहे. सोमवारी ही घटना घडली होती. ज्यानंतर माध्यमांमध्ये त्याविषयीची चर्चा झाली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लॉस एंजेलिस पोलिसांच्या हॉलिवूड विभागातील अधिकारी या पुतळ्याचा शोध घेत असल्याची माहिती 'लॉस एंजेलिस टाईम्स'कडून प्रसिद्ध करण्यात आली आहे. १९५५ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'द सेवन इयर इच' या चित्रपटातील एका दृश्याचा आधार घेत तो पुतळा साकारण्यात आला होता. ज्याप्रकरणीचा तपास सुरु आहे. 


सध्याच्या चोरांनी करवतीने कापून नेलेल्या या पुतळ्याशी संबंधित प्रकरणात संशयितांपर्यंत पोहोचण्याच पोलिसांना यश मिळाले नसले तरीही त्याविषयी लवकराच लवकर शोध लावण्याचं आश्वासन त्यांच्याकडून देण्यात आलं आहे. मन्रोचा हा पुतळा १९९४ मध्ये या ठिकाणी स्थापित करण्यात आला होता. तिच्या तोंडून 'हॉलिवूड....' असे शब्द बाहेर पडतानाचा क्षण त्या माध्यमातून साकारण्यात आला होता. 


दरम्यान, गझेबो साकारल्यानंतर ते मन्रोला समर्पित करण्यात आलं. विविध संस्कृतीतील महिलांच्या उल्लेखनीय कामगिरीवर आधारित असं हे संग्रहालय आहे. ज्यामध्ये डोरेथे डॅंडरीट, मे वेस्ट, ऍना मे वाँग आणि डोलेरेस डेल रिओ यांच्या पुतळ्यांचाही समावेश आहे.