मुंबई : बॉलिवूड स्टार्स असो किंवा हॉलिवूड जगतातील सुपरस्टार,सहसा आपण या स्टार्सची चमक पाहतो पण ती चमक साध्य करण्यासाठी त्यांना किती संघर्ष करावा लागतो हे आपल्यासा दिसत नाही. आज आम्ही तुम्हाला अशाच एका हॉलिवूड गायिकेच्या संघर्षाची कहाणी सांगणार आहोत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एलीचा प्रवास कठीण होता
आम्ही पॉप गायिका एली गोल्डिंगबद्दल बोलत आहोत. एलीच्या बॅगमध्ये अनेक पुरस्कार आहेत आणि संपूर्ण जग तिला ओळखतं. पण या चकाकीपर्यंत पोहोचण्याचा रस्ता तिच्यासाठी सोपा नव्हता.


एली या व्यसनेची शिकार 
खरं तर, एली पॅनीक अटॅकच्या समस्येशी झुंज देत आहे आणि या व्यतिरिक्त तिला जास्त व्यायामाचं व्यसन होतं. स्टारडममुळे तिला अफाट काम मिळालं, जास्त कसरत आणि पॅनीक अटॅकमुळे ती कधीकधी खूपवेळा विक असायची. 34 वर्षीय एलीने अलीकडेच तिच्या एका पुस्तकात अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. मात्र, ती स्वत: ला कमी लेखत असे आणि म्हणूनच ती बर्‍याचदा कॉम्प्लॅक्सला बळी पडत असे.



स्टेजच्या मागे पडायची
जास्त वर्कआउट आणि पॅनीक अटॅकमुळे, एली परफॉर्मन्स आणि फोटोशूट करण्यापूर्वी अनेकवेळा स्टेजच्या मागे पडत असे. पण एलीच्या मेहनतीचं फळ म्हणजे तिला खूप लवकर प्रसिद्धी मिळाली आणि तिचं आयुष्य खूप व्यस्त झालं आणि कधीकधी ती एकाच दिवशी तीन वेगवेगळ्या देशांमध्ये परफॉर्म करण्यासाठी जायची. गायिकेने सांगितलं की, ती कधीही तिच्या जुन्या दिवसांकडे मागे वळून पाहत नाही कारण तिला भीती वाटते की ती वेळ पुन्हा परत येईल.