लॉस एंजेलिस : बॉलिवूड देसी गर्ल प्रियंका चोप्राशी लग्नबंधनात अडकलेला पॉप गायक निक जोनस लग्नानंतर पहिल्यांदा मोठ्या पडद्यावर एन्ट्री करणार आहे. निक 'जुमांजी-वेलकम टू द जंगल'च्या सीक्वलमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सीक्वेलमध्ये निक जेफरसन 'सीप्लेन' मॅकडोनोच्या रूपात आपली भूमिका साकारणार आहे. परंतु, चित्रपटाच्या कथेबाबत कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या चित्रपटासाठी निक अतिशय उत्साही असून त्याने ट्विटरवर चित्रपटाबाबतची पोस्ट केली आहे. 'जुमांजी सीक्वल येणार आहे. अॅलेक्सला पडद्यावर पुन्हा आणण्यासाठी मी अतिशय उत्साही असल्याचं' निकने म्हटलं आहे.



'जुमांजी-वेलकम टू द जंगल' चित्रपटाचा सिक्वेल १३ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. 'जुमांजी-वेलकम टू द जंगल' हा १९९५ साली आलेल्या 'जुमांजी' चित्रपटाचा सीक्वेल आहे. 'जुमांजी'मध्ये रॉबिन विलियम्स यांनी प्रमुख भूमिका साकारली होती. लग्नानंतर निकचा हा पहिलाच चित्रपट आहे.