मुंबई : (Johnny Depp and Amber Heard) सध्या संपूर्ण कलाजगतामध्ये एका जोडीच्या नावाची बरीच चर्चा सुरु आहे. ही जोडी काही वर्षांपूर्वी विवाहाच्या नात्यातून वेगळी झाली असली, तरीही या नात्यामध्ये धुमसणारी ठिणगी काही केल्या विझलेली नाही. ज्याचा सध्या वणवा होत असून, हे नातं आणखी खालच्या पातळीला आलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ही जोडी आहे हॉलिवूड स्टार जॉनी डेप आणि त्याची Ex Wife एंबर हर्ड यांची. या जोडीच्या बहुचर्चित अब्रूनुकसानीच्या खटल्यामुळं सध्या सोशल मीडियावरही दोन गट विभागले गेले आहेत. जिथं कुणी जॉनीची बाजू घेताना दिसत आहे तर, कुणी अर्थातच एंबरची. 


मुद्दा असा, की हा खटला आता सर्वांच्या कुतूहलाचा विषय ठरला आहे. त्यातच न्यायालयातील काही व्हिडीओ समोर आल्यामुळं नेमकं खरं कोण आणि खोटं कोण हे ठरवण्याची किंवा त्यावर तर्क लावण्याची संधीही नेटकऱ्यांना मिळत आहे. 


सध्या समोर आलेल्या व्हिडीओनं अनेकांनाच भांबावून सोडलं आहे, कारण इथं एंबरनं चक्क भर न्यायालयाच हमसून हमसून रडताना फोटोसाठी पोझ दिली आहे. 


व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये दिसत असल्यानुसार एंबर टिश्यू पेपरनं चेहरा पुसत असतानाच आपल्यावर कॅमेराची नजर असल्याचं तिच्या लक्षात येतं आणि लगेचच ती कॅमेरा फोटो घेणार यासाठी म्हणून थांबते. 






अवघ्या क्षणार्धात घडलेल्या या घटनेचा व्हिडीओ पाहिल्यानंतर हिच्यासाठी प्रसिद्धीच सर्वकाही आहे, असे आरोप करत काहींनी तिला धारेवर धरलं आहे. तर, एंबरचं हे वागणं पाहून तिच्या आरोपांमध्ये किती तथ्य आहे, असा संशयाचा प्रश्नही काहींनी उपस्थित केला आहे.