मुंबई : कुठे भेटलात दोघं? कसं जमलं? तुमच्या मिस्टरांना कशी हाक मारता? कुणी कुणाला आधी लग्नासाठी विचारलं?  दोघांपैकी कोण जास्त चिडतं? मिस्टर फिरायला नेतात का? असे खुमासदार प्रश्न विचारत घराघरात रंगणाऱ्या होममिनिस्टरचा फॅनक्लब चांगलाच वाढला आहे. लॉकडाऊनच्या काळात भाऊजी 'होम मिनिस्टर घरच्याघरी'द्वारे तमाम वहिनींची ऑनलाईन भेट घेत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य घरातील वहिनींपासून ते सेलिब्रिटी सौभाग्यवतींना बोलतं करणाऱ्या या होम मिनिस्टर घरच्याघरीमध्ये लवकरच अशा 'सौं' ना भेटण्याची संधी मिळणार आहे ज्या विठ्ठलाच्या नगरीमध्ये राहतात.


चला करूया पंढरीची वारी घरच्या घरी...!! होम मिनिस्टर 'आषाढी एकादशी विशेष' 22 जून ते 1 जुलै, सोम ते शनि संध्या. ६.३० वा. #ZeeMarathi #HomeMinister

Posted by zee marathi on Friday, June 19, 2020

आषाढी एकादशी निमित्त होम मिनिस्टर घरच्याघरी कार्यक्रमात या आठवड्यात खास भाग प्रदर्शित करण्यात येणार आहेत आणि म्हणूनच बांदेकर भाऊजींनी थेट पंढरपूरची ऑनलाईन वारी केली. २२ जुन ते १ जुलै दरम्यान प्रदर्शित होणाऱ्या वारी स्पेशल एपिसोड्स मध्ये भाऊजी आळंदी, देहू, फलटण, पंढरपूर या ठिकाणी स्थायिक असलेल्या वहिनींची भेट घेणार आहेत.



आषाढी एकादशी निमित्त खास होम मिनिस्टर घरच्याघरी वारी विशेष भाग पाहायला विसरू नका सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी ६.३० वाजता फक्त झी मराठीवर!!!