Honaar Soon Mee Hyaa Gharchi : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'होणार सून मी ह्या घरची' (Honaar Soon Mee Hyaa Gharchi). या मालिकेनं प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. आजही प्रेक्षक या मालिकेतील कलाकारांच्या प्रेमात आहे. या मालिकेती एक डायलॉग तर आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे आणि तो म्हणजे 'काहीही हा श्री'. या दोघांना पुन्हा एकदा पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर आहेत. मात्र, कुठे तरी त्यांना वाटत होते की 7 वर्षांनंतर ते पुन्हा एकदा एकत्र येतील का? असा प्रश्न असताना. त्यांच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. श्री आणि जान्हवी (Shree and Janhvi) यांना आपण पुन्हा एकदा एकत्र पाहणार आहोत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'होणार सून मी ह्या घरची' ही मालिका पुन्हा एकदा आपल्याला टीव्हीवर दिसणार आहे. आता ही बातमी वाचल्यानंतर सगळ्या प्रेक्षकांना वाटत असेल की मालिकेचा दुसरा सिझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र, हे अस नसून पुन्हा एकदा ही मालिका एकदा टील्हीवर प्रदर्शित होणार आहे. 13 फेब्रुवारीपासून संध्याकाळी 4 वाजता ही मालिका तुम्हाला झी मराठीवर पाहता येणार आहे. या मालिकेत शशांक केतकर (Shashank Ketkar) आणि तेजश्री प्रधान (Tejashree Pradhan) यांची जोडी प्रेक्षकांच्या मनावर राज्य करून गेली. याच मालिकेत त्या दोघांच्या मैत्रिचे रुपांतर प्रेमात झाले आणि मग त्यांनी लग्न देखील केले. मात्र, काही काळानंतर त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. त्यांनी घटस्फोट घेतला असला तरी देखील प्रेक्षक त्या दोघांना पुन्हा एकदा एकत्र पाहण्यासाठी उत्सुक आहेत. या मालिकेत रोहिणी हट्टंगडी, प्रसाद ओक, लीना भागवत असे अनेक कलाकार होते. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


हेही वाचा : VIDEO : Kiara Advani ला लगीन घाई! खास दोस्ताबरोबर पोहोचली जैसलमेरला


झी मराठीवर मालिकांचे चाहते असणाऱ्या प्रेक्षकांसाठी आणखी एक आनंदाची बातमी म्हणजे होणार सून मी ह्या घरची या मालिकेसोबतच का रे दुरावा मालिका प्रदर्शित होणार आहे. का रे दुरावा या मालिकेत सुयश टिळक आणि सुरुची अडारकर हे दोन्ही कलाकार दिसणार आहेत. तर 13 फेब्रुवारीपासून ही मालिका झी मराठीवर 5 वाजता दिसणार आहे. छोट्या पडद्यावर लोकप्रिय ठरलेल्या या दोन मालिका प्रेक्षकांना पुन्हा एकदा पाहण्याचा आनंद घेता येणार आहे. तर या मालिकेत सुयश सुरुची सोबतच अरुण नलावडे, सुबोध भावे असे अनेक या मालिकेत होते.