मुंबई : अनेक दिवससांच्या ब्रेकनंतर गायक आणि रॅपर यो यो हनी सिंगने 'मखना' या गाण्यातून कमबॅक केलं. परंतु याच 'मखना' गाण्यामुळे तो वादाच्या भोवऱ्यात आडकला आहे. 'मखना' या गाण्यात महिलांबद्दल आक्षेपार्ह आणि अश्लील शब्दांचा प्रयोग केल्यामुळे त्याच्याविरोधात अनेक कलमांतर्गत आरोप दाखल करण्यात आले आहेत.  या प्रकरणी राज्य महिला आयोगाने पंजाब पोलीस ठाण्यात आरोप देखील दाखल केले होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्य महिला आयोगाच्या या गंभीर आरोपांनंतर हनी सिंग आणि भूषण कुमार विरोधात पंजाबच्या मोहाली येथील मटौर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दोघांवर कलम २९४ (गाण्यांच्या माध्यमातून अश्लिलता पसरवणे) आणि ५०६ (गुंडगिरी) कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. 


सदर प्रकरणी पत्र लिहून कारवाई करण्याची मागणी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा मनीषा गुलाटी यांनी केली आहे. गुलाटी यांनी गृह सचिव आणि पोलीस उपअधिक्षकांना पत्र लिहून विरोध दर्शवला. माध्यमांशी संवाद साधतेवेळी, 'आम्ही पोलिसांना संगीतले आहे की,'मखना' गाण्यामध्ये महिलांबद्दल वापरण्यात आलेल्या अश्लिल शब्दांविरोधात एफआरआय दाखल करण्यात यावा', असे त्या म्हणाल्या. 


पंजाबमध्ये 'मखना' गण्याला बॅन करण्यात यावे अशी मागणीही सध्या करण्यात येत आहे. गायक आणि रॅपर हनी सिंगचे 'मखना' हे गाणे २०१८ मध्ये प्रदर्शित करण्यात आले होते. टी-सीरीजच्या युट्यूब चॅनलवर हे गाणे प्रदर्शित करण्यात आले होते. हनी सिंग लिखीत या गाण्याला चाहत्यांनी चांगलेच डोक्यावर घेतले होते. 


याआधी सुद्धा त्याच्या 'मैं हूं बलात्कारी' गण्यामुळे तो वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. हे गाणे २०१३ मध्ये रसिकांच्या भेटीस आले होते. तर दुसरीकडे काही दिवसांपूर्वी हनी सिंगने एका संगीत पुरस्कार सोहळ्यात त्याच्या चार्टबस्टर 'दिल चोरी' गाण्यासाठी 'सॉन्ग ऑफ द इयर'चा अवॉर्ड पटकावला होता.