सप्टेंबरमध्ये रिलीज होणार नाही हनी सिंगचं एकही गाणं
रॅपर हनी सिंग याच्या गाण्यांनी सर्वांनाच भूरळ पाडल्याचं पहायला मिळतं. यंदाच्या गाण्यांमध्ये सर्वाधिक क्रेझ यो यो हनी सिंगची आहे. हनी सिंग याच्या चाहत्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. पण आता हनी सिंगच्या चाहत्यांसाठी महत्वाची बातमी आहे.
नवी दिल्ली : रॅपर हनी सिंग याच्या गाण्यांनी सर्वांनाच भूरळ पाडल्याचं पहायला मिळतं. यंदाच्या गाण्यांमध्ये सर्वाधिक क्रेझ यो यो हनी सिंगची आहे. हनी सिंग याच्या चाहत्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. पण आता हनी सिंगच्या चाहत्यांसाठी महत्वाची बातमी आहे.
गेल्या काही दिवसांपासून बातम्या येत होत्या की, हनी सिंग सप्टेंबर महिन्यात आपली नवी गाणी लाँच करणार आहे. मात्र, या बातमीचं रॅपर हनी सिंग याने खंडन केलं आहे.
हनी सिंगने शनिवारी आपल्या फेसबुक पेजवर एक पोस्ट टाकली आहे आणि त्यामध्ये त्याने अफवांवर भाष्य केलं आहे. पाहूयात हनी सिंग याने नेमकं काय म्हटलं आहे ते...
हनी सिंगने लिहीलं आहे की, "हे खरं आहे की, मी नुकतेच खुप गाणी बनवली आहेत आणि ते लवकरच रिलीज होतील. मात्र, माझं कुठलंही गाणं २८ सप्टेंबर रोजी रिलीज होणार नाहीये. ही केवळ एक अफवा आहे आणि त्याकडे तुम्ही दुर्लक्ष करा". असा संदेश हनी सिंगने फेसबुकच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांना दिला आहे.
हनी सिंगने गायलेल्या गाण्यांवर आजवर अनेकांना आपल्या तालावर थिरकायला भाग पाडलं आहे. बॉलिवूड अभिनेता शाहरूख खान याच्यासाठी 'चेन्नई एक्सप्रेस', अभिनेता अक्षय कुमार याच्यासाठी 'बॉस' या सिनेमात आणि सलमान खानसाठी 'किक' या सिनेमात हनी सिंगने रॅप केलं आहे.