मुंबई : Sidnaaz चे चाहते शहनाज गिलच्या मोस्ट अवेटेड सिनेमा 'हौसला रख' ची अतिशय आतुरतेने वाट पाहत आहेत. शहनाजसोबत पंजाबचा लोकप्रिय अभिनेता आणि गायक दिलजीत सिंह सिनेमात दिसणार आहे. 'हौसला रख' सिनेमाचा टिझर नुकताच सोशल मीडियावर रिलीज झाला आहे. दिलजीत सिंहने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. यामध्ये शहनाज गिल यामध्ये उत्तम अभिनय करताना दिसत आहे. शहनाजचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चित्रपटाच्या टीझरवरून समजले आहे की शहनाज आणि दिलजीत हे एक जोडपे आहे. शहनाजला मुलांची जबाबदारी नको, पण शहनाज गर्भवती राहते आणि त्यानंतर काय होते ते प्रेक्षकांना हसवते. या छोट्या व्हिडीओमध्ये शहनाजने आपले जबरदस्त अभिनय कौशल्य दाखवले आहे. काही सेकंदांच्या व्हिडिओमध्ये सनाच्या अभिनयाचे कौतुक करताना लोक थकत नाहीत. टीझरमध्ये शहनाज गिल खूप सुंदर दिसत आहे आणि तिची अस्खलित पंजाबी देखील लोकांना खूप आवडते यात शंका नाही. हेच कारण आहे की अल्पावधीतच व्हिडिओला 4 लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत.



सिद्धार्थ शुक्लाच्या निधनानंतर शहनाज गिलचा पहिला प्रोजेक्ट सगळ्यांसमोर आला आहे. सिद्धार्थ शुक्लाच्या अचानक निधनाचा शहनाजला खूप मोठा धक्का बसला आहे. शहनाज आजही हे दुःख विसरू शकलेली नाही. बिग बॉसमध्ये हे दोघे एकमेकांच्या अधिक जवळ आले. यानंतर दोघांमध्ये चांगली मैत्री झाली. आणि मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. Sidnaaz लवकरच लग्न करणार असल्याची देखील चर्चा रंगली होती.