मुंबई :  संगीतकार श्रवण राठोड ( Shravan Rathod) यांनी वयाच्या 66 वर्षी अखेरचा श्वास घेतला. कोरोना व्हायरसची लागण झाल्यामुळे त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण आता त्यांचं पार्थिव शरीर अद्याप त्यांच्या कुटुंबाच्या ताब्यात देण्यात आलेलं नाही. केआरके बॉक्स ऑफिस इंडियाने  दिलेल्या माहितीनुसार रूग्णालयाचं बिल न दिल्यामुळे त्यांचं पार्थिव अद्याप रूग्णालयात असल्याचं सांगितलं जात आहे. रूग्णालयाने 10 लाख रूपये बिल मागितलं आहे. पण श्रवण राठोड यांची विमा पॉलिसी असल्याचं देखील सांगण्यात येत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

परंतू, राठोड यांच्या कुटुंबाकडून अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र केआरकेने ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. दरम्यान आता राठोड यांच्या कुटुंबाकडून काय माहिती समोर येते याकडे सर्वांचं लक्ष आहे. राठोड यांच्यावर कोरोनाचे उपचार सुरू असताना त्यांना अन्य आजार असल्याचं देखील समोर आलं. 



श्रवण यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, 1990 साली नदीम-श्रवण (Nadeem-Shravan) या जोडीने चाहत्यांना वेड लावलं होतं. नदीम-श्रवण एकत्र गाण्याची चाल तयार करायचे. 'आशिकी' चित्रपटाच्या माध्यमातून त्यांना नवी दिशा मिळाली. पण जेव्हा गुलशन कुमार  यांच्या हत्येमागे नदीम यांचा  हात असल्याचं सांगण्यात आलं तेव्हापासून नदीम-श्रवण यांच्या जोडीला नजर लगाली. 


नदीम-श्रवण या प्रसिद्ध जोडीने 'आशिकी', 'साजन', 'सडक', 'दिल है की मानता नहीं', 'साथी', 'दीवाना', 'फूल और कांटे', 'राजा हिंदुस्तानी', 'जान तेरे नाम' 'रंग', 'राजा', 'धडकन', 'परदेस', 'दिलवाले', 'राज' अशा अनेक चित्रपटांना संगीत दिलं.