मुंबई : प्रसिद्ध मॉडल, अभिनेत्री, निवेदिका शिबानी दांडेकर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. अलिकडेच तिने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला त्यात ती मद्यपान करताना दिसत आहे. पबमधील पार्टीतील तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. व्हिडिओमुळे ती चांगलीच चर्चेत आली आहे. इतकंच नाही तर तिच्या बोल्ड अंदाज सोशल मीडियावर वारंवार पाहायला मिळतो.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिबानी दांडेकर जे काही घालते ते अगदी स्टाईलने आणि त्यात ग्रेसफुली ती ते कॅरीही करते. तिचे कपडे किंवा मेकअप कधीच लाऊड नसतो. हलके-फुलके कपडे आणि न्यूड मेकअपमध्ये तिचं सौंदर्य घायाळ करणारं असतं.
स्टायलिश किंवा आकर्षक दिसण्यासाठी नेहमी ब्रॉंडेड किंवा डिझाईनर कपडे घालणे गरजेचे नाही. तर तुमचे मोहक हास्यही तुमचे सौंदर्य खुलवते. 



मोहक हास्य, चमकदार डोळे आणि दिलखेचक अदा यामुळे शिबानी दांडेकर स्टायलिश दिसते. अलिकडेच तिने भावेश जोशी सुपरस्टार या सिनेमात च्यवनप्राश गाण्यावर ठुमके लावले आहेत.