मुंबई : बॉलिवूड अॅक्टर पुलकित सम्राट त्याच्या प्रोफेशनल लाईफमुळे जेवढा चर्चेत असतो तेवढाच तो त्याच्या पर्सनल लाईफमुळेदेखील चर्चेत असतो. नेहमीच तो त्याच्या कूल फॅशनसाठी ओळखला जातो. सोशल मीडियावर अभिनेत्याचा चाहतावर्ग खूप मोठा वर्ग आहे. नुकताच पुलकितने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. सध्या अभिनेत्याचे हे फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनेक कलाकार वेगवेगळ्या इव्हेंटसाठी फॅशन मधल्या विविध गोष्टी ट्राय करत असतात आणि अशातच बी टाऊन अभिनेता पुलकित सम्राट सध्या त्याचा स्टाईल सेगमेंट साठी चर्चेचा विषय ठरतोय. नुकताच त्याने अनेक पुरस्कार सोहळ्यात हजेरी लावली आणि पुलकितने या सोहळ्यासाठी विविध फॅशन ट्राय केले आहेत. त्याचा या फॅशनच्या खास अदा जाणून घेऊ या .....


फिल्म फेअर नाईट साठी पुलकितने खास अंदाजात रेड कार्पेटवर हजेरी लावली. ट्राउजर आणि ब्लॅक कोर्ट मध्ये पुलकित फिल्म फेअरसाठी तयार झाला होता.  पुलकित सध्या त्याचा ब्लॅक फॅशनसाठी ओळखला जातो मग त्यात बॅक्लकेस आऊट ब्लेझरची अनोखी फॅशन असू दे किंवा सूटपासून कुर्त्यांपर्यंत विविध फॅशन ट्राय करून पुलकित सध्या फॅशन गेमसाठी ओळखला जातो.


फॅशनसाठी ओळखल्या जाणाऱ्या अनेक बड्या Stylist कडून डिझायनिंग केलेले कपडे पुलकित वापरतोय. कस्टम स्टाईलची  एक वेगळी छाप त्याचा फॅशन मधून दिसून येते.  त्याने समर सुटीग करून अल्ट्रा कुल बॅक लेस बलेझर घालून फॅशन गेम बेस्ट केला आहे. समर फॅशनमध्ये त्याचा हा लूक त्याच्या सगळ्या चाहत्यांना खूप आवडला आहे. 


बॉलिवूड अॅक्टर पुलकित सम्राटने त्याच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे जितका चर्चेत असतो तेवढाच तो,  त्याच्या वैयक्तीक आयुष्यामुळे चर्चेत असतो. अभिनेत्याचं नाव एकेकाळी यामी गौतम सोबत जोडले गेलं होतं. पुलकित त्याची पत्नी श्वेता रोहिराशी वेगळी झाल्यानंतर आणि अभिनेत्री यामी गौतमसोबत त्याचं नाव जोडलं गेलं.  त्यानंतर त्याने त्याचं ट्विटर अकाउंट बंद केलं आहे. या चर्चांना कंटाळून त्याने त्याचं अकाऊंट बंद केलं होतं. तो यामुळे खूप चर्चेत आला होता. 



पुलकित सम्राटला वेगवगळे लूक करायला नेहमी आवडतात. तो त्याच्या सोशल मीडियावरही नेहमीच त्याचे फोटो शेअर करत असतो. त्याने त्याचा कोणताही फोटो शेअर केला तरीही त्याच्या  प्रत्येक लूकची ही चर्चा होतेच होते.