मुंबई : छोट्या पडद्यावरील प्रेरणा या भूमिकेतून घरा-घरात पोहचलेली अभिनेत्री म्हणजेच श्वेता तिवारी. श्वेताची मुलगी पलक तिवारी आजकाल सोशल मीडियावर चर्चेत असते.  इंडस्ट्रीत पाऊल ठेवताच तिने सर्वांवर आपली जादू चालवली आहे. ती केवळ तिच्या स्टाईल आणि ग्लॅमरने चर्चेत नसते तर बॉलिवूडमधील तिची एन्ट्री सध्या चर्चेचा विषय आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पलक आई श्वेतापेक्षा कित्येक पटीने हॉट आणि ग्लॅमरस आहे. पलक कायम सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. 



आता देखील पलकने स्वतःचे काही फोटो इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. फोटोमध्ये पलक हॉट आणि ग्लॅमरस दिसत आहे. शिवाय तिने कॅप्शनमध्ये 'थंडीतील गुलाब...' असं लिहिलं आहे. 


पलकच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, पलक तिवारीने बिजली या गाण्याने सिनेसृष्टीत पदार्पण केलं. शिवाय वरुण धवनसोबत 'भेडिया', 'जुग जुग जिओ' सारख्या सिनेमांमध्ये दिसणार आहे.