मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) मृत्यू प्रकरणानंतर रिया चक्रवर्ती चर्चेत आली. सुशांत सिंह राजपूत याच्या कुटुंबियांनी रिया चक्रवर्ती हिच्यावर आरोप केले. रिया चक्रवर्ती हिला काही दिवस जेलमध्ये राहण्याची वेळही आली. रिया चक्रवर्तीला यामुळे अनेक समस्यांचा सामना करावा लागला होता. अशातच एका मुलाखतीत रिया चक्रवतीने तिने घालवलेल्या जेलमधील तिच्या दिवसांवर वक्तव्य केलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अभिनेत्री रिया चक्रवर्तीने नुकतीच एक मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत रियाने 2020 मध्ये तुरुंगात असतानाचे तिचे अनुभव शेअर केले आहेत. अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर रिया चक्रवर्तीला 28 दिवस तुरुंगात राहावं लागलं होतं. अभिनेत्रीवर आरोप  लावले गेले होते की, ती दिवंगत अभिनेता सुशांतसाठी ड्रग्स खरेदी करायची. त्याचबरोबर सुशांतच्या कुटुंबीयांनी सुशांतच्या मृत्यूला रिया जबाबदार असल्याचाही आरोप केला होता.  आता नुकतीच रियाने एक मुलाखत दिली आहे. या मुलाखतीमध्ये रियाने तिच्या तुरुंगातील दिवसातील तिचा अनुभव शेअर केला आहे.


जेलमध्ये तुम्हाला तुमच्या नंबरावरुन ओळखतात 
रिया म्हणाली की, तुरुंगात तुमची ओळख फक्त एका नंबरवरून होते, जो नंबर तुम्हाला दिला जातो. तुम्हाला जेलमध्ये ठेवलं असत कारण तुम्हाला समाजाने नकारलं असतं. रिया पुढे म्हणाली की, तिला जेलमध्ये तिथे ठेवण्यात आलं होत जिथे कैद्यांना ठेवलं जाते. रिया पुढे म्हणली की, तिला तुरुंगात अनेक अंडरट्रायल महिला कैदी आढळल्या ज्यांच्यावर आरोप झाले पण त्यांना शिक्षा झाली नाही.


जगातील सर्वात आनंदी लोक तुरुंगात सापडले
रियाच्या म्हणण्यानुसार, तुरुंगात असताना या महिलांशी बोलताना तिला खूप काही शिकायला मिळालं, जसे या महिला छोट्या छोट्या गोष्टीत त्यांचा आनंद शोधायला शिकल्या होत्या. या महिलांना रविवारी रात्रीच्या जेवणासाठी समोसे मिळतील किंवा कोणीतरी त्यांच्यासाठी डान्स करत आहे  या गोष्टीमध्येही त्यांनाी त्यांचा आनंद शोधला आहे. आनंदाचे क्षण कसे शोधायचे आणि ते कसे धरून ठेवायचे हे या महिलांना माहीत होतं, असं यावेळी रिया म्हणाली. अभिनेत्रीच्या म्हणण्यानुसार, ती तुरुंगात जगातील सर्वात आनंदी व्यक्तींना भेटली पण अर्थातच तुरुंगात घालवलेला वेळ तिच्यासाठी नरकासारखा होता. रियाने अलीकडेच टीव्ही रिअॅलिटी शो रोडीजद्वारे छोट्या पडद्यावर पुनरागमन केले आहे.