Amitabh Bachchan: अमिताभ बच्चन! आपल्या जबरदस्त अभिनय कौशल्याने देशभरात आणि जगभरात ज्यांचं नाव आहे अशा बिग बी यांची वेगळी ओळख करून द्यायची गरज नाही. बिग बी अमिताभ आपल्या खासगी आयुष्यात कसे आहेत हे जाणून घेण्याची सर्वांनाच उत्सुकता असते. स्वतः शेहेनशा अमिताभ बच्चन हे आपल्या खासगी आयुष्याबाबत काही गोष्टी त्यांच्या ब्लॉगमधून शेअर करत असतात. अशीच एक घटना बिग बी यांनी आपल्या ब्लॉगवर शेअर केली आहे. यावेळी त्यांनी आजारपणाने त्यांच्या अवयवांवर झालेल्या परिणामांबाबत लिहिलं आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमिताभ बच्चन यांनी आपल्या ब्लॉगमध्ये लिहिलं आहे की, KBC च्या सेटवर त्यांची एका अवनी नावाच्या दृष्टिहीन मुलीशी ओळख झाली. अवनीला दृष्टी नाही. या भेटीदरम्यान अमिताभ बच्चन यांनी त्यांना स्वतःला आरोग्याशी संबंधित दुखण्याचीही आठवण झाली. 


काय लिहिलंय अमिताभ बच्चन यांनी? 


अमिताभ यांनी त्यांच्या स्वतःच्या खासगी आयुष्याबाबत या ब्लॉगमध्ये लिहिलं आहे. यामध्ये अमिताभ यांनी त्यांच्या आरोग्याच्या समस्यांवर लिखाण केलं आहे. यामध्ये बिग बी म्हणतात, "असं अनेकदा झालं आहे जेव्हा आजारपणामुळे माझ्या शरीरातील अवयवांनी काम करण्याची क्षमता गमावली. याच्या खोलात मी जाणार नाही. हे ऐकून तुम्हाला मी सिम्पथी गोळा करतोय असं वाटेल. मात्र तसं नाही. मी केवळ माझ्या शरीरातील अवयव काम करणं बंद झालेले हे सांगत आहे. मात्र देवाच्या कृपेने आणि शुभचिंतकांच्या आशीर्वादाने मला सर्व परत मिळालं. आपल्या आसपास असे अनेक जण असतात ज्यांना आणखी एक संधी देत नाही. मात्र स्वतः बिग बी याना री मिळाल्याचेही ते लिहितात. या ब्लॉगमध्ये अमिताभ बच्चन यांनी बाबूजींची एक कविताही लिहिली आहे.  


How Amitabh Bachchan got second chance and recovered from death bed big b writes blog after meeting avani on KBC set