मुंबई : कर्मचारी विमा महामंडळात काम करणाऱ्या अमरीश पुरींना अभिनयाची फार आवड होती. त्यांचं बालपण पंजाबमधील नवांशहरमध्ये गेले. त्यानंतर त्यांची आवड त्यांना मुंबई पर्यंत घेवून आली. अमरीश पुरी जेव्हा २२ वर्षाचे होते, तेव्हा त्यांनी एका हिरोच्या रोलसाठी ऑडिशन दिली होती. ही गोष्टी १९५४ सालची आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चित्रपटाच्या निर्मात्याने त्यांना नापसंत केले आणि निर्मात्याने पुरी यांना म्हटले होते की, तुझ्या चेहऱ्यावर काही हावभाव नाहीत, तुम्ही या भूमिकेसाठी योग्य नाहीत. ही, गोष्ट त्यांच्या मनाला खूप भिडली. अमरिश पुरींना इब्राहीम अल्काजी यांनी १९६१ मध्ये पुरीना 'नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा'च्या रंगमंचावर आणले. 


सुरुवातीला पुरी यांनी मुंबईमध्ये कर्मचारी विमा महामंडळात नोकरी केली. त्या काळात पुरी थियटरसाठी देखील सक्रीय झाले होते. पहिल्यांदा त्यांची मदत सत्यदेव दुबे यांनी केली. सत्यदेव दुबे यांचे अमरीश पुरी हे सहाय्यक बनले.


सुरूवातीला दुबे यांचे नाटकातील सूचना ऐकायला आणि त्यांना काही विचारायला पुरी यांना अवघड जात होतं. त्यावेळी अमरीश पुरी असा विचार करत असतं की, हा कमी उंची असणारा मुलगा मला शिकवत आहे. मात्र त्यानंतर अमरीश पुरी, सत्यजित दुबे यांना गुरू मानायला लागले. याकाळात नाटकांमध्ये पुरी यांची चांगलीच ओळख बनत होती. यानंतर त्यांना अनेक चित्रपटातून ऑफर येऊ लागल्या.


कर्मचारी विमा महामंडळातून अमरीश पुरी राजीनामा देणार होते, पण सत्यदेव दुबे यांनी अमरीश पुरी यांना सल्ला दिला की, जिथपर्यंत तुला चित्रपटात चांगली भूमिका मिळत नाही तिथपर्यंत नोकरी सोडू नको. अमरीश पुरी यांचे पूर्ण मन हे अभिनयात होते. 


दिग्दर्शक सुखदेव यांनी अमरिश पुरी यांना एका नाटकाच्या दरम्यान बघितले होते. नंतर दिर्ग्दशक सुखदेव यांनी 'रेशमा और शेरा' या चित्रपटात त्यांना भूमिका दिली. अमरिश पुरी यांना एका ग्रामीण मुस्लिम व्यक्तीची भूमिका दिली गेली होती. त्यावेळी पुरी ३९ वर्षाचे होते.


अमरीश पुरी हे सत्तरच्या दशकातील चांगले नट होते, त्यांनी अनेक चित्रपटात काम केले, मात्र त्यांना पाहिजे तसे यश मिळत नव्हते. नंतर अमरिश पुरी यांना १९८०मध्ये दिग्दर्शक बापू यांच्या चित्रपटाद्वारे ‘हम पांच’या चित्रपटातही भूमिका मिळाली. त्या चित्रपटात संजीव कुमार, मिथुन चक्रवर्ती, नसीरुद्दीन शाह, शबाना आजमी, आणि राज बब्बर असे अनेक दिग्गज कलाकार होते. 


या चित्रपटात पुरी यांनी एका क्रूर जमीनदार ठाकूर वीर प्रतापची भूमिका साकारली होती. त्यानंतर सुभाष घईचा १९८२ ला आलेला 'विधाता' या चित्रपटाद्वारे त्यांना चित्रपटसृष्टीत चांगलीच प्रसिद्धी मिळाली. नंतर सुभाष घईच्या ‘हीरो’चित्रपटानंतर अमरीश पुरींची लोकप्रियेत वाढली. त्यानंतर त्यांना अनेक चित्रपटात खलनायकाच्या भूमिका मिळू लागल्या.